तर भारतातील जनतेला टॅक्स भरायची वेळ येणार नाही !

मुंबई / रमेश औताडे : भारतातील जनता प्रत्येक गोष्टीवर टॅक्स भरते. त्यामुळे त्यांना महागाईच्या जमान्यात जगणे अवघड झाले आहे. यावर उपाय म्हणून ” टॅक्स फ्री ” या चित्रपटाच्या माध्यमातून सरकारला व जनतेला एक पर्याय सांगितलेला आहे. याबाबतची माहिती चित्रपट निर्माते सुबोध शेट्ये यांनी मुंबई प्रेस क्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी ठक्कर म्हणाले, भारत सरकाने २०२३ साली ५६ लाख करोड रुपये टॅक्स विविध मार्गांनी जमा केला. सरकारने जर कमर्शियल प्रॉपर्टी टॅक्स वसुली १०० टक्के केली तर ७० लाख करोड रुपये जमा होतील. धार्मिक संस्थांच्या जावेगरील या करासाठी विचार केला तर या ७० लाख करोड रुपयात अजून भर पडेल व सामान्य जनता करमुक्त जीवन जगेल. असे शंकर ठक्कर यांनी सांगितले.

यावेळी चित्रपटाचे मुख्य कलाकार सुबोध शेट्ये, रमणीक छेडा व आदी सहकारी उपस्थित होते. ” टॅक्स फ्री इंडिया फुल मुव्ही ” असे यू ट्यूब वर टाईप केले तर प्रेक्षकांना हा चित्रपट मोफत पाहण्यास मिळेल.सामाजिक कार्यकर्त्या दिपा रुपारेल यावेळी म्हणाल्या, सामान्य जनतेने व लोकप्रतिनिधींनी हा चित्रपट पाहिला ते सामान्य जनता सरकारच्या मागे लागून हा फॉर्म्युला अंमलात आणण्यासाठी व्यापक चळवळ उभी करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!