मनोरंजन

तुषार कपूर कधीच करणार नाही लग्न ?; उघड केलं ‘हे’गुपित

बॉलीवूड अभिनेता ४४ वर्षीय तुषार कपूरने नुकतंच बॉलीवूडमध्ये २० वर्ष पूर्ण केले आहेत. तुषार कपूरने त्याच्या खाजगी आयुष्यावर एक मोठा खुलासा केलाय. तुषार कपूर एक हॅप्पी सिंगल फादर आहे. आपल्या ५ वर्षाच्या मुलासोबत तो नेहमीच वेळ घालवताना दिसून येत असतो. तुषार कपूर त्याच्या बहिणीप्रमाणेच अविवाहित राहणार का ? तो कधी लग्न करणार ? या प्रश्नाच्या उत्तरासाठी त्याचे फॅन्स नेहमीच आतुरलेले असतात. पण यावर आता तुषार कपूर स्पष्ट उत्तर दिलंय. त्याच्या लग्नाच्या प्लॅनिंगवर तुषार कपूरने एक मोठी प्रतिक्रिया दिली आहे.

तुषार कपूरने लग्न न करण्याचा निर्णय घेतलाय. सिंगल राहण्यातच तो आनंदी आहे आणि स्वतःला दुसऱ्या कोणासोबत शेअर करणं त्याला पसंत नसल्याचं त्याने एका माध्यमाशी बोलताना सांगितलं. यापुढे बोलताना तुषार म्हणाला, “जर माझे लग्नाचे काही प्लॅनिंग्स असते तर सरोगसीने एका मुलाचा बाप बनण्याचा निर्णय का घेतला असता ? मी प्रत्येक दिवशी माझ्या मुलासोबत वेगवेगळ्या गोष्टीचा आनंद घेत असतो. या पलीकडे जाऊन मी दुसरा पर्याय निवडू शकत नाही. शेवटी सगळं ठीक होतं आणि आताही सगळं ठीक सुरू आहे.”

तुषार कपूरचा मुलगा आता पाच वर्षाचा झालाय. त्याच्या वाढदिवस साजरा करतानाचा एक व्हिडीओ त्याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केलाय. या व्हिडीओमध्ये तुषार आपले वडील जितेंद्र आणि आई शोभा कपूर यांच्यासोबत दिसून आला. हा व्हिडीओ शेअर करताना तुषारने कॅप्शनमध्ये लिहिलं, “बार-बार दिन यह आए,बार-बार दिल यह गाए, तुम जियो हजारों साल, यह मेरी है आरजू…हॅप्पी बर्थ डे टू यू’.” या व्हिडीओवर त्याच्या फॅन्ससह इतर सेलिब्रिटींनीही कमेंट करत मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

ज्येष्ठ दिग्दर्शक प्रकाश झा यांच्या सल्ल्यानुसार तुषारने सरोगसीच्या माध्यमातून बाप बनण्याचा निर्णय घेतला होता आणि तो जून २०१६ मध्ये तो एक सिंगल फादर बनला. तुषारची मोठी बहीण एकता कपूर प्रख्यात चित्रपट निर्माती आहे. एकताने सुद्धा अविवाहित राहण्याचा निर्णय घेतलाय. भावाच्या पावलावर पाऊल ठेवत एकतानेही 2019 मध्ये सरोगसीच्या माध्यमातून मुलीला जन्म दिलाय.  

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!