महाराष्ट्र

तीन अनधिकृत पर्ससीन नौका मालवण समुद्रात पकडल्या..

मालवण : महाराष्ट्रातील जलधी क्षेत्रात मालवण समोर अंदाजे ६ ते ७ सागरी मैल येथे अनधिकृतरित्या पर्ससीन नेटव्दारे मासेमारी करणाऱ्या रत्नागिरी येथील तीन अनधिकृत पर्ससीन नौकांवर सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, सिंधुदुर्ग यांच्या वतीने कारवाई करण्यात आली आहे. महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम १९८१ व सुधारणा अधिनियम २०२१ अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे.

८ सप्टेंबर रोजी सायंकाळी मालवण समोर मत्स्यव्यवसाय विभागाचे अंमलबजावणी अधिकारी गणेश टेमकर, सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी, (परवाना अधिकारी) मालवण हे नियमित गस्त घालत होते. यावेळी रत्नागिरी येथील असलेल्या पर्ससीन नौका सफा मारवा ३ नों. क्र.- IND-MH-४-MM-५२६२, नौका राबिया अब्दुल लतिफ नों. क्र.- IND-MH-४-MM-५२००, व नौका जलसफा २ नों. क्र.- IND-MH-४-MM-६००५ द्वारे महाराष्ट्रातील जलधी क्षेत्रात मालवण समोर अंदाजे ६ ते ७ सागरी मैल येथे अनधिकृतरीत्या पर्ससीन नेटव्दारे मासेंमारी करत असताना पकडले. या तिन्ही नौकांवर नौका तांडेलसह एकूण ५५ ते ६५ खलाशी आहेत.

सदर नौका जप्त करून आनंदवाडी, देवगड बंदरात ठेवण्यात आल्या आहेत. नौकेवर असणाऱ्या मासळीचा लिलाव १ सप्टेबर रोजी सकाळी करण्यात येत आहे. सदर नौकांना लाखो रुपये दंड होण्याची शक्यता आहे.

अंमलबजावणी अधिकारी गणेश टेमकर, सहायक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी, (परवाना अधिकारी) मालवण यांनी मालवण पोलीस ठाणे येथील पोलीस कर्मचारी कुंडलिक वानोळे तसेच सागरी सुरक्षा पर्यवेक्षक व सागरी सुरक्षा रक्षक मालवण व देवगड यांचे सहकार्याने सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय सागर कुवेसकर यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कारवाई केली आहे. अंमलबजावणी अधिकारी यांनी प्रतिवेदन दाखल केल्यानंतर सदर नौकेबाबत सुनावणी मा. सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय, सिंधुदुर्ग यांचे कोर्टात ठेवण्यात येणार आहे. अशी माहिती मत्स्य विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!