रविवारी मुंबईत राज ठाकरे घेणार मेळावा! काय बोलणार याची उत्सुकता…

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची तोफ पुन्हा एकदा धडाडणार आहे. मनसेच्या मुंबईतील पदाधिकाऱ्यांचा मेळावा रविवार 27 जुलै रोजी पार पडणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे या मेळाव्याला उपस्थितीत राहणार असून ते पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात सायंकाळी 5 वाजता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
मनसेच्या या मेळाव्याला मनसेचे नेते, सरचिटणीस तसेच मुंबईतील विभाग अध्यक्ष, उपविभाग अध्यक्ष, शाखाध्यक्ष, मुंबईतील सर्व अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा मेळावा आयोजित करण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे. या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना काय कानमंत्र देणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
मनसेच्या या मेळाव्यात राज ठाकरे नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या मेळाव्यात मुंबई महापालिका निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला जाणार आहे. तसेच ज्या कमकुवत बाजू असतील त्या दुरुस्त करण्याचे काम केले जाणार आहे. याबाबत राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.






