काही जण भगव्या शाली फॅशन म्हणून घालून फिरतात उदय सामंतांचं वक्तव्य

महाराष्ट्र: भगव्या शालीवरून उदय सामंत आणि नितेश राणे यांच्यात चांगलीच जुंपली आहे. काही जण भगव्या शाली घालून मिरवतात असं वक्तव्य उदय सामंतांनी केलंय. त्यामुळे सामंतांचा रोख नेमका कुणाकडे आहे, याची चर्चा सुरू झालीये.उदय सामंत आणि नितेश राणे कोकणातील महायुतीचे मात्र या दोघांमध्येच आता शाब्दिक युद्ध रंगलंय. गेल्या काही दिवसांपासून नितेश राणे यांचे भगवी शाल असलेले अनेक फोटो समोर आले. यावरून उदय सामंतांनी नितेश राणेंना टोला लगावलाय. काही जण भगव्या शाली फॅशन म्हणून घालून फिरतात असं वक्तव्य उद्योगमंत्री उदय सामंतांनी केलं. आपणही भगव्या शाली मागवल्या असून आता घालून फिरण्याचा प्रयत्न करणार असल्याचंही सामंतांनी म्हटलंय.
सामंत यांच्या या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण आलंय. सामंत यांचा रोख मंत्री नितेश राणेंकडे आहे का अशी चर्चा रंगली आहे. नितेश राणेंनीही उदय सामंतांना प्रत्युत्तर दिलं आहे. आमच्याकडे भरपूर भगव्या शाली आहेत, सामंतांना हव्या असतील तर नक्की देऊ, असं राणेंनी म्हटलंय. राजापूर इथं सूर्यमंदिर आणि मशीद असल्याच्या वादावरून नितेश राणे आणि उदय सामंत यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू झालेत.