कोंकण

सिंधुदुर्ग जिल्हा ग्रामसेवक युनियन फुटीच्या मार्गावर: अरूण जाधव ग्रामसेवक उभादांडा यांचा तडकाफडकी राजीनामा

वेंगुर्ला:उभादांडा ग्रामपंचायत येथे कार्यरत असलेले श्री अरुण जगन्नाथ जाधव हे सेवेत हजर झाल्यापासून ग्रामसेवक संघटनेचे एक कायदेशीर सल्लागार म्हणून आत्तापर्यंत त्यांनी  अनेक जणांना ग्रामपंचायतीच्या मोठमोठ्या अडचणीतून ग्रामसेवकांना योग्य मार्गदर्शन करून सोडवलेले आहे. अशा अरुण जाधव सारखा ग्रामसेवकाने ग्रामसेवक संघटनेचा राजीनामा तडकाफडकी देण्याचे कारण गेली कित्येक दिवस एका मागासवर्गीय ग्रामविकास अधिकारी यांना आकस्मिक तपासणीचा  ससेमिरा लावून स्वतः कायद्याचे जखडात अडकलेला एक अधिकारी नाना प्रकारचे शकली लढवून जितका जोर लावता येईल तेवढा कार्यालयाचे अधिकारी आणि पदाधिकारी यांचे शर्तीचे प्रयत्न संपल्यावर शेवटी अन्य युनियन च्या लोकांना हाताशी धरून पोळी भाजण्याचा प्रयत्न केल्याने शेवटी युनियन फुटली तरी चालेल पण अधिकारी वाचला पाहीजे यासाठी ग्रामपंचायतीचे पदाधिकारी यांचा वाद त्याच्यात अधिकारी बरबाद अशी भूमिका न पटल्याने संघटनेत कायदेशीर सल्लागार भूमिका बजावणारे अरुण जाधव यानी राजीनामा देऊन गटविकास अधिकारी यांची आलटून पालटून सुधारित कारवाईस सामोरे जाण्यासाठी सज्ज झालेले आहेत़.

गटविकास अधिकारी नियम आणि अधिनियम यांचा मेळ बसवण्याचा प्रयत्न करून चोर सोडून सन्यासाला फाशी देण्याचा असफल प्रयत्न करत असून कोणाचा दबाव आणू नये असें नियमबाह्य लिहितात याचा अर्थ त्यांचेवर कोणाचा तरी दबाव दिसत आहें.जर नसता तर सदसद्विवेकबुद्धी आणि आत्म आंतर्ज्ञानाने गट फीलिंग यांचे ऐकले असते तर योग्य कारवाई झाली असती आणि विषयाला तोंड फुटले असते पण तोंड दाखवू न शकणारा अधिकारी कोणाचे तरी तोंड दोन्ही बाजूने बडवत आहें आणि बडवुन घेणारे बडवून घेत आहेंत अशा प्रकारे पदाधिकारी अधिकारी संघर्ष पेटला असून त्यातून कायदेशीर सल्लागार आपल्या पदाचा राजीनामा देऊन एक मार्ग संपवून दुसरा नवीन मार्ग सन्मानाने स्वीकारला आहें त्याबाबत लवकरच जाहीर केले जाईल असे रावजी यादव यांनी सांगितले आहे.

अरुण जाधव हें castribe चे सर्व साधारण सभासद आहेत़ परंतु ग्रामसेवक संवर्ग नेहमीच दडपणाखाली कार्यरत असल्याने त्या संवर्गात चेतना निर्माण होण्यासाठी सक्रिय होते आता त्यांना तेथें राहणे योग्य वाटतं नाही म्हणून castribe कडे सक्तीय होणार आहेत़ आणि ते येथे सक्रिय झाले तर…… त्याचा फायदा मागासवर्गीय ग्रामसेवकांनाच नाही तर ज्याना आत्तापर्यंत झालेला आहे तसा इतराना ही अधिकच होईल

आमच्या माहितीनुसार वेंगुर्ला पंचायत समितीचे, तालुक्याचे विकासक म्हणविणारे, स्वतःला सर्वेसर्वा समजणाऱ्या एका विस्तार अधिकाऱ्याच्या दबावाखाली वेंगुर्ला पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अरुण जाधव एक मागासवर्गीय आहे, उभादांडा ग्रामपंचायतीचे सर्व सभासदांनी त्या तथाकथित अधिका-यांवर उभादांडा ग्रामपंचायतची बदनामी केली म्हणून त्यांच्या वर जिल्हा स्तरावरून कारवाईला वेगळे वळण मिळेल यादृष्टीने अरुण जाधव यांना मानसिक आर्थिक त्रास देण्याचे काम हा स्वयंघोषित अधिकारी गटविकास अधिकारी यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून करत आहे, हे स्वयंघोषित अधिकारी करीत तर नसावा? कारण गटविकास अधिकारी सत्य पडताळून न पाहता आलटून पालटून सुधारित नोटीसा देऊन नोटीसीमध्ये कोणत्याही व्यक्तीचा दबाव आणू नये असें नमूद असते याचा अर्थ त्यांचेवर तर कोणाचा दबाव नाही ना? कारण माणसाचा आत्मा कधी खोटं बोलत नाही म्हणजेच आरोप नेहमीच बदलत असल्याने कारवाई करण्याचे योग्य मार्ग सापडत नाहीत म्हणजेच काहीतरी दबाव शक्तीचा प्रयोग असण्याची शक्यता आहें नाहीतर त्यांनी आपल्या सदसद्विवेकबुद्धी आणि गट फीलिंग चा उपयोग करून योग्य ठिकाणी कारवाई केली असती म्हणूनच आमचे माहितीनुसार याबाबत लवकरच याचा स्फोट होणार आहे असे समजते,

अरुण जगन्नाथ जाधव हे जर महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघामध्ये सक्रिय झाले तर त्यांचा त्यांना त्यांच्या इच्छुक पदावर नियुक्ती दिली जाईल. महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचे अतिरिक्त महासचिव रावजी यादव आपल्या पत्रकात म्हणतात.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!