मुंबईतील शाळा आजपासून सुरू,पालक आणि विद्यार्थी मात्र संभ्रमात

मुंबई – मुंबईत आजपासून पहिली ते सातवीच्या शाळा सुरु करा, असे निर्देश मुंबई महापालिकेनं सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना दिले आहेत. पालिकेचे शिक्षणाधिकारी राजू तडवी यांनी याबाबतच्या सूचना सर्व शाळांना दिल्या आहेत. असं असतानाही शाळांकडून कोणत्याही सूचना देण्यात आलेल्या नसल्यामुळं पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं आहे.
‘१५ डिसेंबरपासून शाळा सुरु करा, हे याआधीच शाळांना सुचित केले होते. मात्र तरीदेखील काही शाळांनी आजतागायत पाल्याला शाळेत पाठविण्याविषयी पालकांना कोणत्याही सूचना दिलेल्या नाहीत. ही बाब गंभीर असून पुन्हा नव्याने सूचना देण्यात येतील’, असं मुंबई महापालिकेचे शिक्षणाधिकारी राजू तडवी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.
१५ डिसेंबरपासून पहिली ते सातवीचे वर्ग सुरु करण्याच्या सूचना मुंबई महापालिका शिक्षणाधिकारी राजू तडवी यांनी दिल्या आहेत. मुंबईतील प्राथमिक शाळा सुरु करण्याचा निर्णय महापालिकेनं 30 नोव्हेंबरलाच घेतला होता. कोरोना प्रतिबंधक नियमावलीही त्यावेळी जाहीर करण्यात आली होती. मात्र शाळा सुरु होण्यास एक दिवस शिल्लक असताना शाळांकडून कोणत्याही सूचना देण्यात आलेल्या नाही. त्यामुळे पालकवर्गात संभ्रमाचं वातावरण होतं.