देशभरात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा धोका
आयएमडीकडून देशातील अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीलाच देशभरात उष्णतेचा तीव्र प्रभाव जाणवू लागला आहे. अनेक राज्यांमध्ये तापमानाने सरासरीपेक्षा अधिक वाढ नोंदवली असून, काही ठिकाणी उन्हाळ्याची तीव्रता जाणवू लागली आहे.
आयएमडीकडून देशातील अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुढील 48 तासांमध्ये लडाख आणि जम्मू-काश्मीरमध्ये अतिमुसळधार पावसासह जोरदार बर्फवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार जम्मू-काश्मीरसोबतच पुढील दोन दिवसांमध्ये हिमाचल प्रदेश आणि उत्ताखंडच्या काही भागांमध्ये देखील जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यानंतर या राज्यांमध्ये कडाक्याची थंडी पडू शकतो.
उत्तर भारतात देखील अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे, उत्तर प्रदेश, उत्तराखंडमध्ये 6 आणि 7 फेब्रुवारी रोजी अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. बिहारमध्ये देखील जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. बिहारच्या काही भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुन्हा एकदा चक्रीवादळाची स्थिती निर्माण झाल्यानं हवामान विभागाकडून अलर्ट जारी करण्यात आला आहे. महाराष्ट्राबाबत बोलायचं झाल्यास महाराष्ट्रात देखील पुढील काही दिवस तापमानात काही प्रमाणात वाढ होऊ शकते. तर काही भागांमध्ये गारठा कायम राहणार आहे.