कोंकणमुंबई

मुंबई-गोवा महामार्गावरील खडतर अशा परशुराम घाटाचे काम मे महिन्या पर्यंत पूर्ण होणार..

सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांची ग्वाही

मुंबई: मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामात  सर्वात खडतर असलेल्या  चिपळूण येथील परशुराम घाटाचे काम अत्यंत आव्हानात्मक नैसर्गिक परिस्थितीत सुरु आहे. प्रचंड पावसाळा, दरडी  कोसळत असताना  घाटाचे काम करताना अनंत अडचणी येत असतात, पण तरीही या घाटाचे काम मे २०२२पर्यंत पूर्ण होईल. तसेच परशुराम घाट ते आरवलीपर्यंतच्या सुमारे  ३४ किमी लांबीच्या रस्त्याचे बांधकाम ३१मे २०२३पर्यंत पूर्ण होईल अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी आज विधानसभेत दिली.

रत्नागिरी जिल्ह्यातल्या परशुराम घाटातील चौपदरी रस्त्याच्या संदर्भात भास्कर जाधव यांनी लक्षवेधी सुचना मांडली. कोकणवासीयांच्या जिव्हाळ्याच्या या विषयावर सभागृहात सुमारे तासभर  चर्चा झाली.

भास्कर जाधव यांनी मुंबई गोवा महामार्गाचे रखडलेले काम, धोकादायक झालेला परशुराम घाट, सततच्या दुर्घटनांमुळे पेढे गावातील ग्रामस्थ व घाटातील सुरक्षेचा प्रश्न याकडे सभागृहाचे लक्ष वेधले.

नितीन गडकरींमार्फत पाहणी

मुंबई गोवा महामार्गावरील किती टक्के रस्ता पूर्ण झाला त्याची आकडेवारी अशोक चव्हाण यांनी सादर केली. त्यावर भास्कर जाधव यांनी आक्षेप घेतला. सरकारी अधिकारी मंत्र्यांची दिशाभूल करणारी माहिती देत आहेत. त्यापेक्षा केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना या महामार्गाच्या कामाची पाहाणी करण्यासाठी आमंत्रित करा अशी सूचना केली. अशोक चव्हाण यांनी ही सूचना मान्य केली. त्यावर आपण त्यांना आमंत्रित करून असे आशिष शेलार म्हणाले.

ट्रामा केअर सेंटर उभारा

मुंबई गोवा महामार्गावर प्रत्येक १०० ते २०० किमी अंतरावर ट्राँमा केअर सेंटर उभारण्याची सुचना शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी केली. ट्राँमा केअर सेंटर उभारल्यास अपघातग्रस्तांचे जीव वाचतील असे प्रभू म्हणाले. तर ओणी येथे ट्राँमा केअर सेंटरची मागणी राजन साळवी यांनी केली.

अपघातग्रस्तांची बिकट अवस्था

या महामार्गावर मुंबईकडे येताना होणा-या अपघातांचा दाखल देताना आशिष शेलार यांनी महामहार्गावरील रुग्णालयांची परिस्थिती अतिशय बिकट असल्याचे सांगितले. ट्राँमा केअर सेंटर, आयसीयू, रुग्णालयात स्ट्रेचर नाहीत. अपघातात मृत्युमुखी पडेलल्यांचे पोस्टमार्टेम करण्यासाठी डाँक्टरही नसल्याचे सांगितले.

परशुराम घाटात बोगदा

कशेडी घाटात १७ किमी लांबाची बोगदा होत आहे. परशुराम घाटातील अपघातांचे प्रमाण लक्षात घेऊन या घाटात बोगदा बांधण्याची सुचना शिवसेनेचे रवींद्र वायकर यांनी केली.

आरोग्य विभागाला प्रस्ताव

या सविस्तर चर्चेला सार्वजनिक बांधकाम मंत्री(सार्वजनिक उपक्रम वगळून) अशोक चव्हाण यांनी सविस्तर उत्तर दिले. महामार्गावर ट्राँमा केअर सेंटरचे धोरणच आहे. पण या महामार्गावर ट्राँमा केअर सेंटरची आवश्यक्ता आहे. या महामार्गावरील अपघातप्रवण क्षेत्रात ट्राँमा केअर सेंटर उभारण्याच्या दृष्टीने आखणी करून त्याचा प्रस्ताव आरोग्य विभागाला पाठवून मंजुरी घेण्याचे आश्वासन अशोक चव्हाण यांनी यावेळी दिले

अपघातप्रवण क्षेत्र सुरक्षित करणार

चिपळूणमध्ये अद्ययावत ट्राँमा केअर सेंटर उभारण्याचा विचार करू. परशुराम घाटाच्या परिसरातील अपघाताचे ब्लँकस्पाँट काढण्यात येतील. गस्त घालण्यासाठी मनुष्यबळ पुरवण्यात येईल. इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिस दिली जाईल असे अशोक चव्हाण म्हणाले.

परशुराम घाटातील काम खडतर

परशुराम घाटात अत्यंत प्रतिकूल नैसर्गिक परिस्थिती काम सुरु आहे. एकाबाजूला डोंगर, दुस-या बाजूला खोल दरी आणि पावसाळ्यात चार ते साडे चार हजार मिमी पाऊस पडतो. परशुराम घाटाचे ३.२३ किमीचे काम सुरु आहे. परशुराम घाट ते कशेडी या ४२ किमीपैकी ३९ किमीचे काम पूर्ण झाले आहे.

पीर लोटे ते कळंबसे पर्यायी मार्ग

घाटाचा रस्ता बंद झाल्यास पर्यायी मार्ग म्हणून पीर लोटे ते कळंबसे फाट्यापर्यंतच्या रस्त्याला राज्य महामार्गाचा दर्जा देऊन सिमेट काँक्रीटचा रस्ता करण्यात येणार आहे अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!