महत्वाची बातमी! महाराष्ट्रात कर वाढणार; अजित पवारांनी दिले संकेत

मुंबई:- प्रजासत्ताकदिनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला.यावेळी त्यांनी राज्यातील कोरोना परिस्थिती, राज्याचा अर्थसंकल्प, ओबीसींचे राजकीय आरक्षण या सर्व मुद्द्यांवर आपले मत मांडले. दरम्यान बोलताना राज्यातील कर वाढणार असल्याचे संकेतही अजित पवार यांनी दिले आहेत. कोरोनामुळे राज्यांना खूप फटका बसला आहे,त्यामुळे राज्याचा गाडा चालवण्यासाठी आर्थिक बाबींचा विचार करावा लागेल असंही ते म्हणाले.
याच सोबत अजित पवारांनी,’पूर्वी फक्त सेल्स टॅक्स आणि एलबीटी होतं. त्यानुसार टॅक्स गोळा करून महानगरपालिका, नगरपालिका आणि नगरपंचायती चालायच्या. नंतर त्याच्या तक्रारी वाढल्या. नंतर गेल्या काळात वन नेशन, वन टॅक्स असा निर्णय झाला आणि जीएसटी आलं. त्याला आता पाच वर्ष झाली आहेत.
त्या पाच वर्षाच्या काळात केंद्र ठराविक रक्कम राज्यांना देत होतं. ती आता बंद होणार आहे. सर्व राज्याच्या अर्थमंत्र्यांनी कोरोनाची दोन वर्ष कठीण गेली असून अर्थव्यवस्थेला फटका बसल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे त्या पाच वर्षांमध्ये अजून दोन वर्ष वाढवावी, अशी मागणी केंद्र सरकारला केली आहे. आता त्यावर काय निर्णय घेतात ते पहावं लागेल’, असं मत यावेळी व्यक्त केलं.