अमूल पाठोपाठ आता गोकुळ दुधाचे देखील दर वाढले..
म्हैस दुध २ रुपयांनी तर गायीचे दूध १ रुपयाने वाढले.

मुंबई:कोरोना संकटाच्या काळात सर्वसामान्यांना महागाईचा फटका बसत आहे. पेट्रोल, डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने अन्नधान्य आणि भाजीपाल्याचे दर वाढले आहेत. त्यात आता दुधाची भर पडली आहे. अमूल(Amul Dairy)पाठोपाठ आता गोकुळ दूध(Gokul dairy) संघाने दुधाच्या दरात वाढ करण्यात येत असल्याची घोषणा केली आहे. पालकमंत्री सतेज पाटील यांनी यासंदर्भात माहिती दिली. यावेळी हसन मुश्रीफही उपस्थित होते.
गोकुळ दूध संघाने दूध खरेदी दरात वाढ केली आहे. म्हशीच्या दुधाला २ रुपये तर गायीच्या दुधाला १ रुपयांची वाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच दूध खरेदी दरवाढ ११ जुलै पासून लागू होणार असून, दूध खरेदी दरवाढीमूळे दूध उत्पादकांना दिलासा मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. तसेच कोल्हापूर जिल्ह्यासह अन्य भागांत दूध विक्री दरात वाढ करण्यात येत असल्याची माहिती हसन मुश्रीफ यांनी दिली.