मुंबई
नारायण राणेंच्या अदिश बंगल्यावरील महापालिकेच्या कारवाईला हायकोर्टाची स्थगिती

मुंबई: अदिश बंगल्यावरील मुंबई महापालिकेचा हातोडा तूर्तास थांबवण्यात नारायण राणेंना यश आलंय. उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेच्या कारवाई विरोधातील याचिका पहिल्याच सुनावणीत निकाली काढताना राणेंना मोठा दिलासा दिला आहे.
महापालिकेनं राणेंना पाठवलेल्या नोटीशीवर तूर्तास कोणतीही कारवाई नको असं हायकोर्टानं स्पष्ट केलं आहे. तसेच राणेंनी या नोटीशीला उत्तर देताना ते बांधकाम नियमित करण्यासाठी केलेल्या अर्जावर सुनवणी घेऊन त्यावर पालिकेनं निकाल देणं अपेक्षित आहे. हा निकाल राणेंच्या विरोधात गेल्यास त्यावर तीन आठवडे कोणतीही कारवाई करू नये जेणेकरून त्या निकालाविरोधात पुन्हा दाद मागण्याचा पर्याय राणेंकडे उपलब्ध राहील, असंही हायकोर्टानं आपल्या निकालात स्पष्ट केलंय.