महाराष्ट्रमुंबई

महाराष्ट्रातील बेरोजगारांना मासिक निर्वाहभत्ता मिळावा; समविचारी मंचचा निर्धार!

मुंबई : महाराष्ट्रात २००५ पासून शासकीय नोकर भरतीत कंत्राटी पद्धती सुरु आहे. नोकरीची शाश्वती नसून शासनाच्या विविध खात्या अंतर्गत लाखो पदे रिक्त आहेत. गेल्या वीस वर्षात नोकरभरती नाही. दोन वर्षात काही प्रमाणात भरती झाली पण अनेकविध क्षेत्रातील लाखो बेरोजगार पदव्यांची भेंडोळी घेऊन वणवण फिरत आहेत तर काही नैराश्यग्रस्त बेरोजगार हताशपणे आत्महत्या करीत आहेत. दुसरीकडे शासन बहीण भाऊ करीत पैसे वाटत आहे या पाश्वभूमीवर महाराष्ट्र समविचारी मंचने शाश्वत सेवेची हमी देत नोकरभरती करावी आणि ती होईपर्यंत बेरोजगारांना मासिक निर्वाहभत्ता द्यावा अशा आशयाची मागणी करण्याचा निर्धार केला असून प्रसंगी विविध आंदोलने करण्याचा निर्धार केला आहे या आंदोलनाचा पहिल्या टप्प्यात राज्यभरातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे ई – मेल पाठवून लक्ष वेधण्याचा प्रयत्न होणार आहे. त्यासाठी राज्यभरातील पदाधिका-यांना एकवटून ही मागणी धसास लावण्यासाठी एकत्रित करण्याची तयारी समविचारी मंचच्या पदाधिका-यांनी केली आहे.

गुढीपाडव्याच्या निमित्ताने नेहमेळावा संपन्न झाला. मिरजोळे आदर्शनगर या ठिकाणी झालेल्या या नेहमेळाव्याला सर्वस्वी संस्थापक बाबा ढोल्ये, संजू पुनसकर, रघुनंदन भडेकर, निलेश आखाडे, रवी मयेकर, सिद्देश निमकर, संतोष कांबळे, दिपक जोशी, मनोज मोरे,आनंद विलणकर,मनोहर गुरव, अमित मराठे यांसह महिला पदाधिकारी सौ. जान्हवी कुलकर्णी, संपदा डंबे, शामल हातिसकर,ज्योती भावे,सायली सावंत उपस्थित होते. बेरोजगार मासिक निर्वाह भत्ता या मागणीसाठी राज्यभरातून मुख्यमंत्री यांना एकाचवेळी ई-मेल करण्याचे ठरविण्यात आले असून या मोहीमेची तारीख लवकरच कळविण्यात येईल असे महाराष्ट्र समविचारी मंचच्या वतीने कळविण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!