राज्यपाल नियुक्त १२ आमदारांसाठी उदय सामंत कोर्टात जाण्याची शक्यता, कायदे तज्ज्ञांशी चर्चा करून घेणार निर्णय
रत्नागिरी:- काल सर्वोच्च न्यायालयाने भाजपच्या १२ निलंबित आमदारांचं निलंबन रद्द केलं. यानंतर विरोधकांनी विजयाचे फटाके फोडले.मात्र,आता सत्ताधारी राज्यातील राज्यपाल नियुक्त सदस्यांची नियुक्ती व्हावी यासाठी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहेत.
राज्य सरकारने विधान परिषदेत राज्यपाल नियुक्त सदस्य नेमण्यासाठी नितीन बानगुडे-पाटील यांच्या नावाची शिफारस केली आहे. मात्र, दोन वर्ष झाले तरी नियुक्ती होत नसल्याने आता नितीन बानगुडे-पाटील कोर्टात दाद मागणार आहेत. कायदे तज्ज्ञांशी चर्चा करून ते कोर्टात जाणार आहेत.
तर या संदर्भात कोर्टात पिटीशन दाखल करता येते का? याबाबत कायदेतज्ज्ञांशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याचं राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं आहे. कायदे तज्ज्ञांशी मी वैयक्तिक चर्चा करणार आहे. त्याचा राज्य सरकारशी काहीही संबंध नाही, असंही उदय सामंत यांनी सांगितलं आहे.