मुंबई

मुंबईतील ‘या’ पब, बारवर कठोर कारवाई करा! मुख्यमंत्र्यांनी दिले आदेश

मुंबई – दोन दिवसांपूर्वी वरळीतील हिट अँड रन प्रकरणामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. पुण्यानंतर मुंबईतील हिट अँड रन प्रकरणावरुन राज्यातील जनतेचा दबाव वाढल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर पोलिसांनी पुणे शहरातील नियमांचे उल्लंघन करणाऱ्या सर्व पब व बारवर कठोर कारवाई केली होती. त्यानंतर आता मुंबईतील अपघाताचे वाढते सत्र रोखण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलीस आणि महापालिका प्रशासनाला नियमभंग करणाऱ्या पबवर कठोर कारवाई करण्यात यावी असे आदेश दिले आहेत.

लोकांची सुरक्षितता आणि कायदा-सुव्यवस्थेचे पालन होण्याच्या अनुषंगाने अशा प्रकरणी सर्व संबंधित प्रशासकीय यंत्रणांनी कडक कारवाई करावी, अशी सूचना एकनाथ शिंदे यांनी केली आहे. त्याचबरोबर मद्यधुंद असताना वाहने चालविणाऱ्याचा परवाना रद्द करण्यात यावा. तसेच रस्ते, चौक, वर्दळीची प्रमुख ठिकाणे यांसह नाक्यांवर वाहनचालकांची तपासणी करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दोषींवर कठोर कारवाई करावी, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!