महाराष्ट्रमुंबई

मुख्यमंत्र्यांच्या अधिवेशनातील आदेशाला केराची टोपली, हुक्का पार्लर बारचा नंगा नाच पहाटेपर्यंत सुरूच

मुंबई / रमेश औताडे : कितीही कायदे केले तरी जोपर्यंत त्याची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत त्या कायद्याचा काहीच उपयोग नाही. दिवंगत गृहमंत्री आर आर पाटील यांनी बारबालांचा नंगा नाच बंद केला होता. मात्र पुन्हा हुक्का पार्लरच्या पडद्यामागे जो प्रकार सुरू आहे तो कधी बंद होणार ? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशन काळात हा प्रकार बंद झालाच पाहिजे असे सांगितले होते. त्यांच्या आदेशाला पोलिस केराची टोपली दाखवत आहेत.

पोलिसांनी लवकरात लवकर कारवाई केली नाही तर, आम्ही आमच्या स्टाईल मध्ये हा नंगा नाच बंद करणार असा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरद पवार गट चे उत्तर पश्चिम जिल्हाध्यक्ष सचिन भाऊ लोंढे यांनी दिला आहे. अनेक ठिकाणी हुक्का पार्लर बार शुक्रवार शनिवार रविवार सकाळी सात वाजेपर्यंत सुरू असतात.

अंधेरी एमआयडीसी पोलीस ठाणे, ओशिवरा एमआयडीसी, बोरिवली, बांद्रा आंबोली अशा अनेक ठिकाणी हुक्का पार्लर बार चालू असतात. सकाळी सात वाजेपर्यंत युवक युवती बेधुंद नशेमध्ये त्या ठिकाणी हुक्का बंद असताना देखील बिनधास्तपणे नंगा नाच करत आहेत. पोलीस स्टेशनला तक्रार दिल्यानंतर हुक्का पार्लरवर थातुर मातुर कारवाई करण्यात येते. म्हणून आता राष्ट्रवादी युवकांनी खळ खटॅक आंदोलनाचा इशारा दिला आहे. त्यावेळी कायदा सुव्यवस्था धोक्यात आली तर त्याची जबाबदारी पोलिसांची राहील असे लोंढे यांनी सांगितले.

मुंबई पोलीस आयुक्त व पालिका आयुक्त, संबंधित सर्व विभाग यांची भेट घेऊन निवेदन देत त्यांच्या निदर्शनास आणून देणार व नंतर खळ खटॅक आंदोलन करणार. नशेत धुंद असणारे हे उद्योगपतींचे चिरंजीव युवक युवती वेगात कार चालवत गरिबांचा जीव घेतात. काही बेधुंद नशेखोर चोऱ्या करतात, आमच्या आया बहिणीची छेड काढतात.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनामध्ये हा सर्व प्रकार बंद झाली पाहिजे असे आदेश दिले होते. तरी देखील हुक्का पार्लर बार चालू असतात.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!