महाराष्ट्रमुंबईराष्ट्रीय

बांगलादेशी नागरिकांना नागरिकत्वासाठी आजी-माजी आमदारासह दहशतवादी संघटना देखील सहभागी – किरीट सोमय्या

नाशिक : किरीट सोमय्या हे मंगळवारी पत्रकार परिषदेमध्ये बोलत असताना म्हणाले की मालेगाव मधील रोहिगट्याना वास्तव्याचा पुरावा उपलब्ध करून दिल्या प्रकरणी काही खुलासे करताना सांगितले की या प्रकरणांमध्ये तहसीलदार तसेच महानगरपालिकेचे अधिकारी यांनी कोणताही तपास केला नाही तसेच या ठिकाणी रेशन कार्ड देखील मोठ्या प्रमाणावर ती बोगस बनवून दिले गेले आहे असे स्पष्ट करून ते पुढे म्हणाले की या सर्व प्रकरणांमध्ये मालेगाव मधील माजी आमदार विद्यमान आमदार यांच्यासह तहसीलदार आणि एका आतंकवादी संघटनेच्या मोहरक्या सहभागी आहे. ते म्हणाले की या प्रकरणाची चौकशी दहशतवाद विरोधी पथकाकडून सुरू झालेली आहे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एक पथक हे या ठिकाणी दाखल झाले आहे आणि ते तपास करीत आहे. मालेगाव मध्ये बांगलादेशी नागरिकांच्या नागरिकत्व देण्याच्या प्रकरणांमध्ये दहशतवाद विरोधी पथक तपास करीत असून प्रकरणात पश्चिम बंगाल आसाम आणि मालेगाव मधील काही लोकप्रतिनिधी सहभागी असल्याची माहिती भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी दिली आहे .

प्रश्न उत्तर देताना सोमय्या पुढे म्हणाले की हे सर्व प्रकरण हे पश्चिम बंगाल आसाम या भागातून सुरू होत असून राज्याच्या काही भागांमध्ये म्हणजेच मालेगाव मध्ये या सगळ्या प्रकरणाची सुरुवात झाली आणि मुंबई व इतर भागांमध्ये अशा प्रकारे जन्माचे दाखले व इतर कागदपत्र तयार करून देण्यात आली असेही त्यांनी सांगितले. किरीट सोमय्या पुढे म्हणाले की या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका एसआयटीची स्थापना करून त्यामध्ये महसूल पोलीस आणि नगरसचिव विभागाचे अधिकारी सहभागी करून या सर्व प्रकरणाची पडताळणी करावी आणि हे सर्व रद्द करून संबंधित तहसीलदार व इतर अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!