कोंकण
पेजे कुटुंबीयांकडून पालकमंत्री उदय सामंत यांचे आभार
रत्नागिरीकरांची अनेक वर्षांपासून असलेली मागणी पूर्ण

रत्नागिरी – रत्नागिरीतील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाला लोकनेते श्यामराव पेजे यांचे नाव दिल्याबद्दल पेजे कुटुंबीयांनी पालकमंत्री उदय सामंत यांचे आभार मानले. अभियांत्रिकी महाविद्यालयाचे नामकरण लोकनेते श्यामराव पेजे अभियांत्रिकी महाविद्यालय असे करून या वास्तूचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते काल करण्यात आले. रत्नागिरीकरांची अनेक वर्षांपासून असलेली मागणी पूर्ण झाल्याबद्दल पेजे यांच्या कुटुंबीयांनी अत्यंत आपुलकीने सामंत यांचा सत्कार केला. यावेळी विकास पेजे, शिरीष पेजे, रामभाऊ गराटे, राजन होतेकर तसेच पेजे कुटुंबातील सदस्य उपस्थित होते. सामंत ह्यांनी पेजे कुटुंबीयांच्या आदरतिथ्याबद्दल त्यांनी धन्यवाद दिले.