‘कपिल शर्मा शो’मध्ये काम केलेल्या या अभिनेत्याने केले विष प्राशन,कारण ऐकून तुम्हालाही धक्का बसेल

मुंबई- छोट्या पडद्यावरील ‘द कपिल शर्मा शो’ हा लोकप्रिय कॉमेडी शो पैकी एक आहे. या शोमध्ये काम केलेल्या प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. दरम्यान, या शोमध्ये काम केलेल्या अभिनेता तीर्थानंदने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. पण सुदैवाने तो आता सुखरुप आहे.
तीर्थानंदने विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने त्याच्या शेजाऱ्यांना याविषयी वेळीच समजल्याने त्यांनी त्याला रुग्णालयात दाखल केले आणि तीर्थानंदचे प्राण वाचले. चार दिवस रुग्णालयात राहिल्यानंतर तीर्थानंदला डिस्चार्ज देण्यात आला आहे.
तीर्थानंद हा हुबेहूब नाना पाटेकरांची नक्कल करायचा.‘आधीच आर्थिक समस्या असताना कुटुंबीयांनीही माझी साथ सोडली. मी रुग्णालयात असतानाही आई किंवा भाऊ मला भेटायला आले नव्हते. आम्ही एकाच कॉम्प्लेक्समध्ये राहतो. माझे कुटुंबीय माझ्याशी बोलत नाहीत. माझ्यावर कर्जाचं ओझं आहे.
जिच्यासोबत लग्न केलं, तिने पळून दुसऱ्याशी लग्न केलं. माझ्या मुलीसोबतही माझा संपर्क नाही. माझ्या कामाने मला ओळख आणि पैसा दिला. मात्र आता पुन्हा मी हीरोवरून झीरो झालो आहे’, असे तीर्थानंद एका मुलाखतीत म्हणाला होता.याच दडपणातून त्याने हा प्रयत्न केल्याचे बोलले जात आहे.