‘वर्ल्ड कम्युनिकेशन फोरम’चे सदस्यत्व मिळविणारे मुंबईचे कारुळकर दाम्पत्य जगात पहिले

मुंबई,दि.४ : कारुळकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. प्रशांत कारुळकर व त्यांच्या पत्नी प्रतिष्ठानच्या उपाध्यक्ष सौ. शीतल जोशी-कारुळकर यांना `वर्ल्ड कम्युनिकेशन फोरम असोसिएशनने (WCFA) कॉर्पोरेट सदस्यत्व बहाल केले असून हा सन्मान मिळविणारे जगातील ते पहिले आणि तेही भारतीय दाम्पत्य ठरले आहे.
दावोस, स्वीर्त्झलँड येथे असलेल्या या संस्थेच्या परिषदेला दरवर्षी उपस्थित राहण्याचा सन्मान या दाम्पत्याला आता मिळणार आहे.
भारताची शान वाढविणार प्रशांत कारुळकर
जाहिरात, डिजिटल मार्केटिंग, मिडीया, पीआरसह संचार जगतातील, विविध क्षेत्रातील, जगभरातील नामवंत या परिषदेला उपस्थित राहतील. ही परिषद दरवर्षी २६ जानेवारीच्या आसपास दावोसच्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या प्रशस्त सभागृहात भरते. तेथे फक्त जगभरातील निवडक आमंत्रित सदस्यांना उपस्थित राहता येते. या सन्मानाबद्दल कारुळकर दाम्पत्यावर सर्व क्षेत्रांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.