राज्यात व मुंबईत कोरोना रूग्णसंख्या घटली…

मुंबई : राज्यात कोरोना बधितांच्या संख्येत कालच्या तुलनेत आज दिलासादायक चित्र पाहायला मिळत आहे.आज गेल्या २४ तासात राज्यात कोरोनाच्या ४३,२११ नव्या रुग्णांची नोंद झाली असून १९ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात गेल्या २४ तासात ३३,३५६ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. काल कोरोना बांधितांचा आकडा ४६ हजारांच्या घरात होता मात्र आज काहीसा खाली आलेला पाहायला मिळत आहे.
दरम्यान राज्यात राज्यात आज २३८ ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झालेली आहे. आतापर्यंत १६०५ ओमायक्रॉनबाधितांची नोंद राज्यात झाली आहे. त्यापैकी ८५९ रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहेत.
मुंबईतील कोरोना परिस्थिती-
मुंबईतील कोरोना रुग्णाची संख्या काहीशी स्थिरावताना दिसत आहे. मागील काही दिवसांत रुग्णसंख्या काही प्रमाणात कमी होत असल्याने प्रशासनासह नागरिकांनाही दिलासा मिळाला आहे. आज सापडलेल्या रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या जवळपास दुप्पट असल्याचेही समोर आले आहे. मागील २४ तासांत ११ हजार ३१८ नवे कोरोनाबाधित सापडले असून ९ जणांचा मृत्यू झाला आहे. गुरुवारच्या तुलनेत ही काही प्रमाणात संख्या कमी आहे.