दिलासादायक:राज्यात आज एकही ओमायक्रॉन रूग्ण नाही…कोरोना रूग्णसंख्या स्थीर, तर मुंबईत रूग्णसंख्या घटली…

मुंबई:- राज्यात कालपासून कोरोनाची रुग्णसंख्या स्थीरावल्याचं चित्र आहे.कालच्या तुलनेत आज रुग्णसंख्येत काहीशी घट झाल्याचे पाहायला मिळाले आहे.आज राज्यात आज ४६ हजार ४०६ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर ३४ हजार ६५८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर दिलासादायक बाब म्हणजे राज्यात आज ओमायक्रॉनच्या एकाही रुग्णांची नोंद झालेली नाही.
आतापर्यंत १३६७ ओमायक्रॉनबाधितांची नोंद राज्यात झाली आहे. त्यापैकी ७७५ रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहेत.राज्यात आज ३६ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर २ टक्के झाला आहे. राज्यात सध्या २ लाख २१ हजार ४७७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यात आतापर्यंत ६६ लाख ८३ हजार ७६९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.३९ टक्के आहे.
मुंबईतील कोरोना परिस्थिती
मागील २४ तासांत १३ हजार ७०२ नवे कोरोनाबाधित सापडले असून ६ जणांचा मृत्यू झाला आहे. बुधवारच्या तुलनेत ही संख्या जवळपास तीन हजाराने कमी असली तरी अजूनही रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत असल्याने कोरोनाचा धोका मुंबईकरांना कायम आहे. त्यामुळे योग्य काळजी घेऊन नियम पाळणं महत्त्वाचं झालं आहे.