महाराष्ट्रमुंबई

पर्यटकांना वाचवताना प्राण गमावलेल्या युवकाच्या कुटुंबासाठी एकनाथ शिंदे यांच्याकडून पाच लाखांची आर्थिक मदत

मुंबई : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याच्यावेळी स्वतःच्या जिवाची पर्वा न करता पर्यटकांच्या रक्षणासाठी धावून जाणारा सय्यद आदिल हुसैन शाह या अवघ्या २० वर्षांच्या स्थानिक युवकाचा देखील मृत्यू झाला. माणुसकी दाखवत धाडसाने दहशतवाद्यांना सामोरे जाणान्या सय्यदच्या निधनाबद्दल हळहळ व्यक्त करतानाच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वैयक्तिकरित्या सय्यदच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपयांची मदत केली आहे. पहलगाम येथे मदतीसाठी गेलेले शिवसेना कार्यकर्ते व सरहद संस्थेचे पदाधिकान्यांच्या माध्यमातून शुक्रवारी सय्यद आदितच्या कुटुंबीयांना धनादेश दिला.

यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या कुटुंबीयांशी संवाद साधून त्यांना धीर दिला. सय्यद आदिलच्या घोड्यावरून जो प्रवासी पहलगामची सफर करत होता त्याला वाचवण्याचा प्रयत्न सय्यदने केला. समोर आलेल्या दहशतवाद्याची रायफल हिसकावून घेण्याचा प्रयत्न त्याने केला असता दहशतवाद्यांना केलेल्या गोळीबारात त्याचा मृत्यू झाला. हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांच्या मदतीसाठी शिंदे बुधवारी (ता. २३) श्रीनगरला गेले होते. त्यावेळी त्यांना सय्यद आदिलची माणुसकी आणि धाडसाबाबत सांगण्यात आले. त्याची दखल घेत शिंदे यांनी सय्यद आदितच्या कुटुंबीयांना मदत देण्याचा निर्णय घेतला.सय्यद आदिलने बहादुरी दाखवत माणुसकीचे अनोखे उदाहरण जगासमोर दाखवून दिले आहे, त्याचे हौतात्म्य वाया जाणार नाही. त्याच्या कुटुंबाचे मोडकळीस आलेले घर नव्याने बांधून देण्यासाठी मदत करू. 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!