मुंबई

मुंबईत सीएनजी आणि पीएनजीच्या दरात वाढ

मुंबई – आधीच महागाईने बेजार झालेल्या सर्वसामान्य मुंबईकरांना आणखीन महागाईचा फटका बसण्याची शक्यता आहे. सीएनजी आणि पीएनजीच्या दरामध्ये आजपासून म्हणजेच ९ जुलैपासून वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबईकरांच्या खिशाला कात्री लागणार आहे. मध्यरात्रीपासून सीएनजी आणि पीएनजीचे नवे दर लागू झाले आहेत. सीएनजीच्या दरात दीड रुपयांनी तर पीएनजीच्या दरात १ रुपयाने वाढ झाली आहे.

मुंबईत सीएनजी-पीएनजी गॅस पुरवणा-या महानगर गॅस लिमिटेडने दरवाढ करण्याचा निर्णय घेतला. आज रात्रीपासून नवे दर लागू झाले आहेत. सीएनजीच्या दरामध्ये दीड रुपयांनी वाढ झाली असून मुंबईकरांना आता एक किलो सीएनजीसाठी ७५ रुपये मोजावे लागणार आहे. तर पीएनजीच्या दरात १ रुपयाने वाढ झाली असून पीएनजीचा दर ४७ रुपयांवरून ४८ रुपये इतका झाला आहे.

दरम्यान, सीएनजी गॅसच्या दरामध्ये वाढ झाली असल्यामुळे आता मुंबईतील वाहनधारकांना याचा मोठा फटका बसणार आहे. आता सीएनजीच्या खरेदीसाठी वाहनधारकांना जास्त पैसे मोजावे लागणार आहे. तसेच, सीएनजीच्या दरामध्ये वाढ झाल्यामुळे आता मुंबईकरांचा प्रवास देखील महाग होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!