महाराष्ट्रमुंबईराजकीय
राज्यातील ठाकरे सरकारने आता पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात करावी: भाजपाची मागणी

मुंबई:केंद्र सरकारने दिवाळी अगोदर एक दिवस पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात प्रति लिटर पाच रुपये आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात १० रुपयांनी कपात केली, त्यामुळे दिवाळीच्या मुहूर्तावर पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरांमधून सर्वसामान्यांना दिलासा मिळाला.केंद्र सरकारने इंधन दरात कपात केल्यानंतर राज्यातही महाविकास आघाडी सरकारने पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात करावी, अशी मागणी भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली आहे.
केंद्रातील मोदी सरकारने पेट्रोल डिजेलच्या किमतीत ५ व १० रुपयाची कपात केली आहे. आता वेळ राज्यातील ठाकरे सरकारची आहे. राज्यात केंद्राप्रमाणे ५ व १० रूपये कपात व्हायलाच हवी, पण त्या बरोबर राज्य सरकारने गेल्या दोन वर्षात जे ५ रूपये वाढवले तेही कमी व्हायला हवे,” असं केशव उपाध्ये यांनी ट्विट करून म्हटले आहे.