मुंबई

फिनले मिल पुन्हा सुरू करण्यासाठी राज्य सरकार पुढाकार घेणार – उपमुख्यमंत्री

राज्य सरकार आर्थिक सहकार्य करायला तयार

अमरावती – अमरावती जिल्ह्यातील अचलपूर येथील फिनले मिल पुन्हा सुरू करण्यासाठी महाराष्ट्राचे वेगळे मॉडेल तयार करून तातडीने प्रस्ताव तयार करावा, राज्य सरकार यासाठी पुढाकार घेईल,असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.सह्याद्री अतिथीगृह येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली अचलपूर येथील फिनले मिल संदर्भात आढावा बैठक संपन्न झाली.

बैठकीला वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांतदादा पाटील, आमदार रवी राणा, आमदार बच्चू कडू (ऑनलाइन) केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव रोहित कन्सल, सहसचिव प्राजक्ता लवंगारे,उपमुख्यमंत्री कार्यालयाचे सचिव श्रीकर परदेशी,वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव सौरभविजय, वस्त्रोद्योग विभागाचे सचिव वीरेंद्र सिंह, फिनले मिल मधील कामगार व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, फिनले मिल सुरू करण्यासाठी राज्य सरकार आर्थिक सहकार्य करायला तयार आहे. महाराष्ट्र शासनाच्या भागीदारीचा सहभागाचा घेऊन वेगळे मॉडेल विकसित करण्यासाठीचा सविस्तर प्रस्ताव तातडीने तयार करावा. तसेच मिलमधील काही कामगारांना शंभर टक्के वेतन दिले जात नाही. ते पुढील महिन्यापासून सर्वांना शंभर टक्के वेतन सुरू करावे, आशा सूचनाही उपमुख्यमंत्रीश्री.फडणवीस यांनी यावेळी दिल्या.

अमरावती जिल्ह्यातील फिनले मिल सुरू होणे आवश्यक आहे. या मिलमुळे मोठ्या प्रमाणत रोजगार निर्मिती आणि वस्त्रोद्योगाला चालना मिळणार आहे. मिल सुरू करण्यासाठी केंद्र सरकारशी समनव्य करून ही मिल सुरू करण्यासाठी राज्य सरकार पुढाकार घेईल असेही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.बैठकीत वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी फिनले मिल सुरू करण्या येत असलेल्या अडचणी, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि मिल कामगार यांची मागणी यासंदर्भात माहिती देऊन मिल सुरू करण्यासाठी वस्त्रोद्योग विभागाचा सहभाग याबाबत माहिती दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!