कोंकण
खेडजवळ मार्गावर दरड कोसळल्याने कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळित

रत्नागिरी – कोकण रेल्वेमार्गावर खेड तालुक्यात दिवाणखवटी रेल्वे स्थानकाजवळ अतिवृष्टीमुळे दरड कोसळल्याने कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळित झाली आहे.
मुंबईकडे जाणारी मांडवी एक्स्प्रेस सायंकाळी साडेपाच वाजल्यापासून खेड स्थानकात थांबवण्यात आली आहे, तर मुंबईकडून येणारी नेत्रावती एक्स्प्रेस गाडी विन्हेरे रेल्वे स्थानकात थांबविण्यात आली आहे. याशिवाय अनेक गाड्या चार ते पाच तास वेगवेगळ्या स्थानकांत उभ्या आहेत. श्री गंगानगर एक्स्प्रेस कामथे स्थानकात, तेजस आणि जनशताब्दी एक्सप्रेस रत्नागिरीत, दिवा-सावंतवाडी पॅसेंजर दिवाणखवटी स्थानकात थांबवून ठेवण्यात आली आहे.
रेल्वेमार्गावरील माती काढण्यासाठी अजून अडीच तासांहून अधिक चार तास लागू शकतात. याचा परिणाम पुढच्या गाड्यांवर होण्याची शक्यता आहे.