ब्रेकिंग
कोरोनाच्या पार्श्वभुमीवर विधानभवन सचिवालयात आता दोन शिफ्टमध्ये होणार कामकाज

मुंबई:- सध्या राज्यात कोरोनाचा प्रसार वाढत चालला आहे.याच धर्तीवर ५०% क्षमतेने खासगी कार्यालये सुरू ठेवण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. दरम्यान एकीकडे सरकारी कार्यालये पूर्ण क्षमतेनेच सुरू असताना दुसरीकडे खबरदारीचा उपाय म्हणून विधान भवनाच्या सचिवालयातील कामकाज आता दोन सत्रात चालणार आहे.याबाबतचे परिपत्रकच अवर सचिवांकडून काढण्यात आले आहे.
पहिले सत्र हे सकाळी नऊ ते दुपारी तीन तसेच दुसरे सत्र हे दुपारी एक ते सायंकाळी सात असणार आहे. त्यासंदर्भातील नियोजन संबंधित अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर करावे असे देखील निर्देश देण्यात आले आहेत.
सध्या राज्यात कोरोना मोठ्या प्रमाणात वाढत असून यावर नियंत्रण मिळवण्यासाठी आरोग्य यंत्रणा काम करत आहे.अश्यातच विधिमंडळाने कोरोनाचा धोका लक्षात घेता दोन सत्रात कामकाज करण्याचा निर्णय घेतला आहे.