राजकीयगोरेगाव मिररमहाराष्ट्रमुंबई

…तर मी राजकारणातून निवृत्त होईन-सुनिल प्रभू

मुंबई : राज्यात विधानसभा निवडणूक प्रचार जवळपास अतिम टप्प्यात आला आहे. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांच्या आरोपाच्या फेऱ्याही जोरात सुरू आहेत. अशातच मुंबईतील दिडोंशी मतदारसघातील आमदार सुनिल प्रभू यांनी संजय निरुपम यानी केलेल्या आरोपांबाबत सांगितले की त्यांनी जे खोडसाळ आरोप केले ते पुराव्यानिशी सिद्ध करून दाखवले तर मी राजकारणातून निवृत्त होईन..

सुनील प्रभू हे शिवसेना ठाकरे गटाचे नेते आहेत. मुंबईमधील दिंडोशी विधानसभा मतदारसंघामधून ते सलग दोन टर्म आमदार म्हणून निवडून आले आहेत. या बरोबरच मुंबई चे महापौर पद त्यांनी भूषवलेलं आहे..

यावेळी बोलतांना प्रभू म्हणाले  “आपला महाराष्ट्र सुसंस्कृत आहे. त्यामुळे माझ्या मतदारसंघाशी माझी नाळ जुळलेली आहे. येथील जनतेशी माझा जनसंपर्क मोठा असल्याने मी नेहमीच विकास कामांना घेवून लोकांसमोर जात आहे. गेल्या दहा वर्षांत मी मोठया प्रमाणात विकासकामे केली आहेत. शिवाय पुढील पाच वर्षात पण चांगल्याप्रकारे माझ्या दिंडोशी मतदार संघात काम करणार असल्याचे यावेळी आमदार सुनिल प्रभू यांनी नमूद केले.

 मला कामाच्या गुणवत्तेवर या ठिकाणी दिडोंशी मतदारसंघात महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून जनता निवडून देईल आणि भरघोस मतांनी निवडून देईल. असा मला ठाम विश्वास आहे.

मी केलेल्या कामाच्या जोरावर विजय माझा होणार असल्याचे मी स्पष्ट करत आहे. मी मागील दहा वर्षांमध्ये रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण, मुंबई महापालिकेच्या शाळांचे काम, नविन शाळा बांधकाम, सिव्हील लाईनचे काम, डीपी रोड उघडे करण्याचे काम, डायलिसिस सेंटर, लायब्ररी अशी जनतेच्या हिताची भरपूर प्रमाणात कामे केलली आहेत. त्यामुळे मला विजयाची खात्री असल्याचे यावेळी सुनिल प्रभू यांनी सांगितले. सध्याची कामे वास्तवात दिसतायेत तेच माझ्यासाठी महत्त्वाचा फॅक्टर ठरतील.  मी दहा वर्षे विधानसभेमध्ये फक्त हजेरी लावायसाठी गेलो नाही तर जनतेचे काम करण्यासाठी मी तिथे गेलो आणि जनतेने मला तिथे पाठवले त्यामुळे मी जनतेचा माणूस आहे आणि जनतेसाठी काम करत आहे. शेवटी विकास कामावर मी लढतोय त्यामुळे मला विश्वास आहे.

निश्चितच आम्ही या ठिकाणी निवडून येऊ जे लोक आम्हाला म्हणतात बिल्डरांसाठी काम केलंय त्यांनाही आम्ही आमच्या कामाची पोच पावती दाखवून देवू, मी आमदार असतांना कोणाचीही मिंदेगिरी केली नाही, करत नाही त्यामुळे माझा लोकांशी जनसंपर्क माझा चांगला आहे. शंभर पैकी शंभर कामे होत नाहीत हेही मला माहिती आणि लोकांनाही माहिती आहे त्यामुळेच मतदारांना माझ्यावर विश्वास आहे. या भागातील आमदार ज्यांना आपण निवडून दिलं होतं ते त्याला जे एवढे काम करता आले त्यांनी ते काम केले असल्याचे प्रभू यांनी सांगितले. लोकशाहीमध्ये निवडणुका होत असतात माझी लढत कोणत्याही पक्षासोबत नसून माझी साथ संगत विकासासोबत आहे त्यामुळे दिंडोशीची जनता ठरवेल की कोणाला निवडून द्यायचे आहे. माझ्या वचननाम्यात दिलेले शब्द मी पूर्णपणे सिद्ध करून दाखवणार आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!