..तरच कोरोना चाचणी करा; आयसीएमआरची नवी नियमावली

नवी दिल्ली – संपूर्ण जगाची चिंता वाढवणाऱ्या ओमायक्रॉनने देशातही आपले हातपाय पसरले आहेत. देशात एकंदरीतच कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क झालं असून वेगवेगळ्या उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. केंद्र सरकारकडून सोमवारी कोरोना चाचणीबाबत नव्या गाईडलाईन्स जारी करण्यात आल्या आहेत.
जर एखाद्या व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग झाला, तर त्याच्या संपर्कात आलेल्यांना कोरोना चाचणी करण्याचा सल्ला दिला जातो. मात्र, आता आयसीएमआरच्या नव्या गाईडलाईन्सनुसार, कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्या लोकांची कोरोना चाचणी करण्याची गरज नाही. कोरोना रुग्णांचा संपर्कातील व्यक्तीच्या कोरोना चाचणीबाबत आता इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (ICMR) नव्या गाईडलाईन्स जारी केल्या आहेत.
या नियमाप्रमाणे एखादी व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्यास त्याच्या संपर्कातील लोकांना कोरोना चाचणी करण्याचा सल्ला दिला जातो. मात्र, आता कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्या लोकांची कोरोना चाचणी करण्याची गरज नाही. कोरोना रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तीला जास्तीचा धोका नसेल अशाच व्यक्तींसाठी हा निर्णय आहे. मात्र, ज्यांचे वय जास्त आहे किंवा त्यांना अन्य आजार आहे, त्यांना कोरोना चाचणी करावी लागणार आहे.