विकेंडला बाहेर जाण्याचा प्लॅन करताय? मग थांबा! या ठिकाणी पडू शकतो पाऊस
महाराष्ट्रातील ११ जिल्ह्यांमध्ये येत्या शनिवारी आणि रविवारी पावसाच्या सरी बरसणार

मुंबई:- तुम्ही विकेंडला बाहेर जाण्याचा प्लॅन करण्याच्या तयारीत असाल तर थांबा आणि ही बातमी पूर्ण वाचा. कारण, या विकेंडला पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार महाराष्ट्रातील ११ जिल्ह्यांमध्ये येत्या शनिवारी आणि रविवारी पावसाच्या सरी बरसणार आहेत.
मुंबईसह पुणे,ठाणे, पालघर, नाशिक नंदुरबार, धुळे, जळगाव, अहमदनगर, रायगड आणि रत्नागिरी या अकरा जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. सध्या राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये थंडीचा कडाका कायम आहे. तर काही भागांमध्ये दमट वातावरण तयार झालं आहे. अशात या ११ जिल्ह्यांमध्ये पावसाचं वातावरण तयार होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
२२ आणि २३ जानेवारी रोजी कोकणसह मध्य महाराष्ट्रात ढगाळ वातावरण राहणार आहे. तर याच विकेंडला हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी बरसणार आहेत. त्यामुळे तुम्ही जर वीकेंडचा प्लॅन करणार असाल तर ही बाब आवर्जून लक्षात ठेवा आणि खबरदारी घ्या.