वैद्यकीय

वजन कमी करण्यासाठी घरातील हे पदार्थ तुम्हाला मदत करतील,वाचा

नविन वर्षाच्या सुरूवातीला अनेकांनी वजन कमी करण्याचा संकल्प केला असेल.याच संकल्पाला हातभार लावत वजन कमी करण्यासाठी आवश्यक असलेल्या गोष्टींची आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत.

पालक- पालेभाज्यांमध्ये पालक ही भाजी सहज उपलब्ध होणारी आहे. १०० ग्रॅम पालकमधून साधारणत: २३ कॅलरीज्‌ आपणास मिळू शकतात. एका अभ्यासानुसार, एखाद्या महिलेने रोजच्या आपल्या आहारात केवळ पाच ग्रॅम पालकचा जरी समावेश केला तरी त्यातून ४३ टक्के चांगल्या पध्दतीने वजन कमी करण्यासाठी उपयुक्त ठरत असते. पालक एक हंगामी भाजी असल्याने ती सहजपणे उपलब्ध आहे.

पपई- प्रत्येक १०० ग्रॅम पपईमागे आपल्याला ४३ कॅलरीज्‌ मिळतात. पपईचा औषधी गुणधर्म असल्याने तिचा वापरदेखील बऱ्याच कारणांसाठी होत असतो. यात कमी कॅलरीज्‌ असल्याने हे तुम्हाला वजन कमी करण्यासाठी फायद्याचे ठरु शकते.

मशरुम- प्रती १०० ग्रॅममध्ये २२ केलरीज्‌ मिळत असलेले मशरुम हे ‘व्हिटामीन डी’ने परिपूर्ण आहेत. मशरुम हे केवळ वजन घटवण्यासाठीच नव्हे तर मानसिक संतुलन, क्षायराड, प्रतिकारशक्ती वाढवणे, कर्करोगापासून बचाव करणे आदी विविध आजारांवरदेखील वरदान ठरु शकतात.

बीट- बीट हे अत्यंत गुणकारी व महत्वपूर्ण घटक आहे. प्रत्येक १०० ग्रॅम बीटमागे आपणास ४३ कॅलरीज्‌ मिळू शकतात. लाल रंग असलेल्या बीटमध्ये मोठ्या प्रमाणात ॲंन्टीऑक्सीडेन्ट असतात. बीटचा वापर विविध औषधी घटक म्हणूनही करता येतो.

काकडी- वजन कमी करण्यात काकडी हे अतिशय उत्तम कामगिरी बजावते. १०० ग्रॅम काकडीमधून १५ कॅलरीज्‌ मिळतात. जास्त खर्चीक नसलेली व सहज उपलब्ध असलेली काकडी सर्वच जण कमी अधिक प्रमाणात आपल्या रोजच्या जेवणात समाविष्ट करत असतो.वजन कमी करण्यासाठी काकडी एका चमत्कारापेक्षा कमी नाही. पाण्याच्या स्त्रोताने परिपूर्ण असलेली काकडी आपल्या शरीराला पाण्याच्या कमतरतेपासूनही वाचवते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!