ही लक्षणं सांगतील मुलांना चष्मा लागण्याची चिन्हे,वाचा सविस्तर

तंत्रज्ञानात जसे बदल होत गेले तसं तसे आपल्या आरोग्यावरही त्याचे काहीसे परिणाम होत गेले. तंत्रज्ञान जसे आपल्यासाठी वरदान आहेत तसेच तंत्रज्ञानाचे आपल्या आरोग्यावर होणारे दुष्परिणामही आहेत. सध्याची पिढी ही तंत्रज्ञानप्रेमी आहे. लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वजण सध्या नवीन तंत्रज्ञानाचा वापर करत आहेत. मात्र, याचा आपल्या जीवनशैलीवर फार मोठा परिणाम होत आहे.
लहान मुलं सतत मोबाईलचा वापर करतात. यामधील व्हिडिओ गेममध्ये ते सतत व्यस्त असतात. एका जागेवर बसून व्हिडीओ गेम खेळणं तासनतास मोबाईलकडे पाहत राहणं यामुळे त्यांच्या डोळ्यावर देखील परिणाम होताना पाहायला मिळतो. परिणामी त्यांना चष्मा लागू शकतो.पुढील लक्षणे जर तुम्हाला किंवा तुमच्या मुलांना जाणवत असतील तर त्यांना चष्मा लागला आहे हे नक्की.
१.डोळे चोळणे:-
मोबाईलच्या सततच्या वापरामुळे डोळ्यातून पाणी येते. यामुळे डोळे काहीसे लाल होतात. यामुळे डोळ्यात अनेकदा जळजळ होते. लहान मुलं जोरात डोळे चोळू लागतात. परिणामी त्यांचे डोळे कमकुवत होऊ लागतात.अश्यावेळी डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्वाचे ठरू शकते.
२.डोकेदुखी-
सतत मोबाईल वापरल्यामुळे डोकेदुखीचा त्रास देखील जाणवू लागतो. सततची डोकेदुखी मुळे चष्मा लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. वास्तविक,कमकुवत डोळ्यांनी लक्ष केंद्रित केल्याने डोकेदुखी होऊ शकते.
३. डोळ्यांमधील थकवा:-
अनेकदा लहान मुलं एकाग्र होऊन वाचू शकत नाहीत, स्पष्ट पाहू शकत नाहीत, त्यांच्या डोळ्यातून सतत पाणी येत असते. अशा मुलांना डोळ्यांचा थकवा जाणवू लागतो. यावेळी त्यांच्या डोळ्यांची तपासणी करणे आवश्यक आहे आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना चष्म्याची देखील गरज आहे का? हे तपासणे महत्त्वाचे आहे.