मुंबईब्रेकिंग

ब्रेकींग न्युज:आचारसंहितेपूर्वी राज्य सरकारचा मोठा निर्णय, मुंबईत प्रवेश करणाऱ्या पाचही नाक्यांवर टोलमाफी

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून टोलमाफीची घोषणा, आज रात्रीपासून अंमलबजावणीला सुरुवात. मुंबईतील प्रवेश करणाऱ्या पाचही टोल नाक्यांवर हलक्या मोटर वाहनांना संपूर्ण टोल माफी देण्यात येणार आहे. नुकत्याच झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. आज रात्री बारा वाजल्यापासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे. वाशी, दहिसर, ऐरोली, आनंदनगर आणि एलबीएस मुलूंड या टोलनाक्यांवर टोलमाफी असणार आहे. विधानसभेची आचारसंहिता कोणत्याही क्षणाला लागू शकते.

मुंबईतील प्रवेश करणाऱ्या पाचही टोल नाक्यांवर हलक्या मोटर वाहनांना संपूर्ण टोल माफी देण्यात येणार आहे. नुकत्याच झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. आज रात्री बारा वाजल्यापासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे. वाशी, दहिसर, ऐरोली, आनंदनगर आणि एलबीएस मुलूंड या टोलनाक्यांवर टोलमाफी असणार आहे.आज निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेऊन राज्याच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा करण्याची शक्यता आहे. मंत्रालयात हालचाली गतीमान झाल्या असून आज महायुती सरकारची ही शेवटची मंत्रिमंडळाची बैठक ठरण्याची शक्यता आहे. या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची राज्य मंत्रिमंडळात मोठी घोषणा केली आहे. मुंबईतील प्रवेश करणाऱ्या पाचही टोल नाक्यांवर हलक्या मोटर वाहनांना संपूर्ण टोल माफी करण्यात आला आहे. आज रात्री बारा वाजल्यापासून अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!