ब्रेकिंग

दिलासादायक! राज्यात आणि मुंबईत कोरोना रुग्णसंख्येत मोठा उतार; राज्यात रुग्णसंख्या ६ हजारांनी घटली तर मुंबईत केवळ ९६० रुग्ण

मुंबई:- राज्यातील कोरोना रुग्ण संख्येचा आलेख आता उतरणीला लागला आहे. गेल्या २४ तासात राज्यात कोरोनाचे १५ हजार १४० नवे रुग्ण आढळले आहेत.तर ३९ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात गेल्या २४ तासात ३५ हजार ४२३  रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.  

तर दुसरीकडे राज्यात आज ९१ ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. आतापर्यंत ३२२१ ओमायक्रॉनबाधितांची नोंद राज्यात  झाली आहे. त्यापैकी १६८२ रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे. 

मुंबईतील कोरोना परिस्थिती:-
मुंबईत आज नवे ९६० कोरोनाबाधित आढळले असून १ हजार ८३८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. ज्यामुळे मुंबईत सद्यस्थितीला ९ हजार ९०० सक्रिय कोरोनारुग्ण आहेत.मुंबईत आज ९६० नवे रुग्ण आढळले असून ११ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर मागील २४ तासांत १ हजार ८३७ जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या मुंबईचा रिकव्हरी रेट ९७ टक्के इतका आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!