स्वयंपाक बनवण्यासाठी उशीर झाला म्हणून पत्नीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न,पुण्यातला धक्कादायक प्रकार

पुणे:- पुण्यामध्ये माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. स्वयंपाक बनवायला उशीर झाला म्हणून पतीने पत्नीला डिझेल टाकून जाळण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.पिंपरीच्या नेहरूनगरमध्ये हा प्रकार घडला आहे.
५ फेब्रुवारीच्या दुपारी नवरा बाहेरून आला. पत्नी घरामध्ये स्वयंपाक करत होती. बाहेरून डोक्यात राग घेऊन आलेल्या पतीने स्वयंपाक बनवायला उशीर झाला या कारणाने पत्नीवर राग काढला.तिच्या अंगावर डिझेल टाकून तिला जाळण्याचा प्रयत्न या नराधमाने केला आहे.या घटनेत पीडित महिला ही ३५ ते ४० टक्के भाजली असून तिच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या प्रकरणी पती राहुल पारधे विरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पिंपरी पोलिसांनी त्याला अटक केली आहे. राहुल पारधे हा आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर नेहमी संशय घेत असल्याचीही माहिती पोलिसांनी दिली आहे.याच संशयावरून आरोपीने हे कृत्य केल्याचे बोलले जात आहे.दरम्यान या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे.