रत्नागिरीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्ञान केंद्र पुढील एक वर्षात उभारणार – मंत्री उदय सामंत

रत्नागिरी : राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत ह्यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंती महोत्सव निमित्त रत्नागिरी येथे बुद्धीस्ट सोसायटी ऑफ इंडिया, भारतीय बौद्ध महासभा, जिल्हा व तालुका महिला विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती रत्नागिरी यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमास उपस्थित राहून अभिवादन केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या समतेच्या विचारानेच रत्नागिरी जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून तुम्हाला सर्वांना सोबत घेऊन काम करणार असल्याचा शब्द यावेळी मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी दिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या राज्यघटनेमुळेच आम्ही लोकप्रतिनिधी आहोत हे आम्ही कधीही विसरणार नाही असा विश्वास यावेळी उदद्य सामंत ह्यांनी व्यक्त केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आत्मसात करून आपण सर्वांनी वागले पाहिजे अशी अपेक्षा यावेळी उदय सामंत ह्यांनी व्यक्त केली आणि त्यासाठी रत्नागिरीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्ञान केंद्र पुढील एक वर्षात उभारण्याचे काम केले जाईल असा शब्द यावेळी उदय सामंत ह्यांनी दिला. तसेच रत्नागिरीमध्ये देशातले सर्वात चांगले बौद्ध विहार उत्पादन शुल्कच्या जागेवर उभे राहणार असल्याचेही यावेळी उदय सामंत ह्यांनी सांगितले. यावेळी या कार्यक्रमाचे माजी आमदार बाळासाहेब माने, अतिरिक्त जिल्हाधिकारी शंकरजी बर्गे, प्रांताधिकारी जीवनजी देसाई, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष एल.व्ही. पवार, दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया जिल्हा शाखा सचिव दिपक जाधव, सुदेश मयेकर, राजन शेट्ये, निमेश नायर, वैभवी खेडेकर, विजय खेडेकर, हरीश शेकासन, प्रशांत पवार, यांसह भीमसैनिक, अनुयायी व मोठ्या संख्येने नागरिक हे उपस्थित होते.