मुख्यमंत्री उध्दव ठाकरे शिष्टमंडळासह पंतप्रधानांच्या निवासस्थानी भेटीसाठी दाखल

नवी दिल्ली : आज दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट होतेय. या भेटीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार तसंच काँग्रेस नेते आणि महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तसंच मराठा आरक्षण उपसमिती प्रमुख अशोक चव्हाण मुख्यमंत्र्यांसोबत आहेत. सकाळी ११.०० वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोक कल्याण मार्ग स्थित निवासस्थानी ही बैठक होतेय. मिळालेल्या माहितीनुसार, मराठा आरक्षण, Maratha Reservation,जीएसटीचा परतावा GST लसीकरण Vaccinations अशा अनेक मुद्यांवर पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांच्यात ही चर्चा होणार आहे.
मराठा आरक्षणप्रश्नी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची PM Modi भेट घेणार आहे. दरम्यान मुख्यमंत्र्यांचे शिष्टमंडळ विशेष विमानाने सकाळी सात वाजता दिल्लीकडे रवाना झाले आहे. मराठा आरक्षणाबरोबरच केंद्राकडे राज्याचे असलेली जीएसटीचे पैसे, तोक्ते चक्रीवादळात झालेले नुकसान आणि इतर मुद्दे या संदर्भात हे शिष्टमंडळ पंतप्रधानांना भेटणार असल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे.
गेल्या दिवसांपासून राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्यात वाद उफाळून आला होता. राज्यातील कोरोना स्थिती, औषधांचा तुटवडा आदी गोष्टींवरुन राज्य सरकार केंद्राला आरोपीच्या पिंजऱ्यांत उभे करत होते, यामुळे या भेटीला एक वेगळं महत्त्व प्राप्त झाले आहे. दरम्यान आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मराठा आरक्षणविषयक उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण, राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे आणि शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर असं शिष्टमंडळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीला जाणार आहे.
मराठा आरक्षणाबद्दल सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिला त्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांची भेट घेतली होती. मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे यासाठी राज्यपालांच्या माध्यामतून पंतप्रधान आणि राष्ट्रपतींना विनंती करत राज्यपालांना पत्र दिले होते. तसेच भविष्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेणार असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले होते.
मुख्यमंत्र्यांचा दौरा!
- सकाळी 7 वाजता मुंबईहून विमानाने दिल्लीसाठी रवाना होणार
- सकाळी 9 वाजता दिल्ली विमानतळावर दाखल होणार
- सकाळी 9.45 वाजता महाराष्ट्र सदन इथे आगमन
- सकाळी 10.15 वाजता नवी दिल्लीतील लोक कल्याण मार्गावरील पंतप्रधान निवासकडे रवाना
- सकाळी 10.30 वाजता पंतप्रधानांच्या निवासस्थानी आगमन होणार
- सकाळी 11 वाजता पंतप्रधान मोदी यांच्यासोबत बैठक
- बैठकीनंतर सोयीनुसार मुंबईकडे विमानाने प्रयाण