राष्ट्रीयमहाराष्ट्रमुंबईराजकीयविदर्भ

उद्धव ठाकरेंच्या हेलिकॉप्टरची हेलिपॅड वर उतरताच झडती…

मुंबई : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यभरात प्रचारसभांचा धडाका लावला आहे. उद्धव ठाकरे यांची आज वणी येथे सभा झाली आहे. या सभेसाठी ठाकरे हेलिकॉप्टरने गेले आहेत, वणी हेलिपॅडवर उतरताच ठाकरे आणि मिलिंद नार्वेकर यांची बॅग निवडणूक अधिकाऱ्यांनी तपासल्याचे समोर आले आहे. वणीच्या हेलीपॅडवर उतरताच उद्धव ठाकरे, हेलिकॉप्टरची झडती घेण्यात आली त्यावेळी त्यांचे सहकारी मिलिंद नार्वेकर यांच्या बॅगा तपासण्यात आल्या आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे संतापल्याचे पाहायला मिळाले. यावेळी त्यांनी महायुतीवर जोरदार निशाणा साधला.. ज्या बॅग तपासण्यावरून गदारोळ सुरू असून याचा व्हिडिओ आता समोर आला आहे. या व्हिडिओमधून निवडणूक अधिकारी उद्धव ठाकरे यांच्या बॅग तपासताना दिसून येत आहेत.

शिवसेना यूबीटीने याचा व्हिडिओ पोस्ट करत म्हटले आहे की, डॉ. बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानात सगळ्यांना समान न्याय हे आम्ही मानतोच. पण यंत्रणांना हाताशी धरुन लोकशाहीला पायदळी तुडवून हुकुमत गाजविणाऱ्या दिल्लीश्वरांनी मात्र त्या संविधानाचा सगळ्याच पातळ्यांवर अवमान करायचा ठरवलं आहे. उद्धवसाहेबांच्या सामानाची वणी येथे काही अधिकाऱ्यांकडून तपासणी करण्यात आली. झालं ते उत्तमच झालं! कर नाही त्याला डर कशाला? पण आता अशीच तपासणी कमळाबाईच्या आणि गद्दारांच्या सामानाची पण व्हायलाच हवी! जनतेला समजायला हवं, खोके कोण, कुठून आणि कसं नेतंय आणि चोर सोडून सन्यास्याला फाशी देण्याचा प्रयत्न कोण करतंय! व्हिडिओमध्ये अधिकारी ठाकरेंच्या बॅग तपासताना दिसत आहेत. उद्धव ठाकरे यांचा आवाज व्हिडिओमध्ये येत आहेत. महाराष्ट्रातल्या तपासण्या करायला सुद्धा आता बाहेरच्या राज्याची माणसं आणली जातात, असं म्हणत उपहासात्मक टोला त्यांनी यावेळी लगावला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!