मुंबई
जे.जे.रूग्णालयात पार पडलं दिव्यांग व्यक्तींसाठी युडीआयडी कार्ड वाटप शिबिर

मुंबई,दि.४- दिव्यांग व्यक्तींना वैश्विक ओळखपत्र (युडीआयडी कार्ड) देण्यात येत असते.मात्र, कोरोना आणि लॉकडाउनमुळे त्याला थोडा उशीर होत होता.मात्र आता जे.जे.रूग्णालयात या कार्डांच्या वाटपाचे शिबिर आयोजित करण्यात आले आहे.त्यामुळे दिव्यांग व्यक्तींना हे कार्ड मिळणे सुखकर होणार आहे.
दिव्यांग व्यक्तींना युडीआयडी कार्ड देण्यात येत असते.त्याचा त्यांना विविध कामांसाठी उपयोग होत असतो.जे.जे.रूगणालयाच्या प्रशासकीय भवन इमारत,लेडीज हॉस्टेलच्या बाजूला,चौथा मजला येथे दिनांक ३ ते ७ जानेवारी दरम्यान हे कार्ड वाटप शिबिर आयोजित करण्यात आले आहे.सकाळी १० ते ४ या कालावधीत हे कार्ड वाटप होणार असून ८ हजार कार्डांचे वाटप होणार असल्याची माहिती जे जे रूग्णालयाचे हेड क्लार्क अनिल दळवी यांनी दिली आहे.