सिंधुदुर्ग सत्र न्यायालयाचा नितेश राणेंना दणका! न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला

सिंधुदुर्ग : शिवसैनिक संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा आरोप असलेले भाजप आमदार नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली.या सुनावणीवर निर्णय देताना नितेश राणेंना न्यायालयाने धक्का देत नितेश राणेंचा नियमित जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.
आमदार नितेश राणेंच्या जामीन अर्जावर सोमवारी युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर कोर्टाने त्यांच्या जामीनाबाबतचा निर्णय राखून ठेवला होता. दरम्यान आज कोर्टाने निर्णय दिला असून आमदार नितेश राणेंचा जामीन नाकारला आहे. यानंतर आता नितेश राणे पुन्हा हायकोर्टात धाव घेणार असून जामीनासाठी दाद मागणार आहेत.
आता यावर हायकोर्ट काय निर्णय देतंय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.दरम्यान,’इथे जामीन मिळणार नाही याची आम्हाला खात्री होती. त्यामुळे आम्ही लगेचच हायकोर्टामध्ये अर्ज केला आहे. उद्या किंवा परवा यावर हायकोर्टात सुनावणी होईल’, असं नितेश राणेंच्या वकिलांनी सांगितलं आहे.