अविवाहित जोडप्यांना शारीरिक संबंधांचा अधिकार नाही,दिल्ली उच्च न्यायालयाचा निर्णय

दिल्ली- लग्नांनंतर शारीरिक संबंधांची अपेक्षा ठेवणं योग्य आहे.मात्र, अविवाहित जोडप्यांना तो अधिकार नाही,असं दिल्ली उच्च न्यायालयाने सोमवारी निकाल देताना हे स्पष्ट केलं.तसंच महिलांच्या लैंगिक अधिकाराशी कोणतीही तडजोड केली जाऊ शकत नाही आणि बलात्काराच्या कोणत्याही कृत्याला शिक्षा झालीच पाहिजे, असं दिल्ली उच्च न्यायालयानं सोमवारी एका सुनावणी दरम्यान म्हटलं आहे. मात्र यावेळी वैवाहिक आणि विवाहबाह्य संबंधांमध्ये ‘गुणात्मक फरक’ आहे असे मत न्यायालयाने नोंदविले आहे.
वैवाहिक नातेसंबंध जोडीदाराकडून योग्य लैंगिक संबंधाची अपेक्षा करण्याचा कायदेशीर अधिकार सूचित करते. न्यायमूर्ती सी. हरिशंकर यांनी वैवाहिक बलात्काराचे गुन्हेगारीकरण करण्याच्या याचिकेवर सुनावणी करताना म्हटलं की, विवाहबाह्य संबंध आणि वैवाहिक संबंध ‘समांतर’ असू शकत नाहीत. न्यायमूर्ती हरिशंकर हे न्यायमूर्ती राजीव शकधर यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाचा भाग होते.
न्यायमूर्ती हरिशंकर यांनी, ‘मुलगा आणि मुलगी कितीही जवळचे असले तरी शारीरिक संबंधांची अपेक्षा ठेवण्याचा अधिकार कोणालाही नाही. मला तुझ्यासोबत शारीरिक संबंध ठेवण्याची इच्छा नाही, हे सांगण्याचा प्रत्येकाला पूर्ण अधिकार आहे. वैवाहिक जीवनात गुणात्मक फरक आहे. तसेच बलात्काराचा गुन्हा दंडनीय असून त्यासाठी १० वर्षांची शिक्षा आहे, याचाही सुनावणी दरम्यान आवर्जुन उल्लेख केला गेला. वैवाहिक बलात्काराची सूट काढून टाकण्याच्या मुद्द्यावर ‘गांभीर्याने विचार’ करण्याची गरज आहे, असंही ते म्हणाले.