राजकीयमहाराष्ट्रमुंबई

एक है तो सेफ है’, ‘मोदी है तो मुमकीन है’…, फडणवीसांकडून “जनतेला दंडवत…!”

मुंबई : यंदाची निवडणूक ऐतिहासीक होती. ‘एक है तो सेफ है’, ‘मोदी है तो मुमकीन है’, यावर विश्वास दाखवत जनतेने महायुतीला अभूतपूर्व जनादेश दिला. त्याबद्दल राज्याच्या जनतेला साष्टांग दंडवत करतोय. अशाप्रकारे भाषणाची सुरूवात करत राज्याचे नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी आपल्या भाषणाची सुरूवात केली. तसेच एकनाथ शिंदे, अजित पवार आणि मित्र पक्षांचे आभार मानतो, अशा शब्दांत भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. पंतप्रधान मोदी यांनी बूथवर काम करणाऱ्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला तिसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून संधी दिली. त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानतो. भाजपचे अध्यक्ष जे.पी.नड्डा यांचेही आभार मानतो. त्याचबरोबर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ताकद दिली. त्यांचेही आभार मानतो. शिवसेना आणि राष्ट्रवादीसह भाजप कार्यकर्त्यांचे आभार मानतो. महाराष्ट्र भाजप पूर्ण ताकदीने मैदानात होता. त्या सर्व टीमचे आभार मानतो. महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी, उन्नतीसाठी 24 तास काम करेल. जनतेच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी कटीबद्ध असेल, अशा भावना फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केल्या.

याप्रसंगी फडणवीस म्हणाले की, भारतीय संविधानाच्या अमृतमहोत्सवी वर्षात महायुतीचे सरकार स्थापन होत आहे. याचा विशेष आनंद आहे. देशाचे दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची जन्म शताब्दी याच वर्षी आहे. या महत्त्वाच्या वर्षात मोठी जबाबदारी आणि जनादेश महाराष्ट्रातील जनतेने महायुतीला दिला आहे. लाडक्या बहिणी, लाडका भाऊ, शेतकरी, दलित आदींसह सर्व समाजातील घटकांनी विश्वास दाखविला. त्याबद्दल आभार मानतो. आम्हाला अभिमान आहे की, 2019 नंतर एकही आमदार किंवा नेता आम्हाला सोडून गेला नाही. सर्वजण एकत्र राहिले आणि आम्ही 2022 मध्ये सरकार स्थापन केले. आज महायुतीलाही सत्ता मिळाली आहे.

भाजपच्या विधीमंडळ गटनेतेपदी एकमताने निवड झाल्यानंतर महाराष्ट्राला सर्व आघाड्यांवर पुढे आणण्याकरता आपल्याला सातत्याने काम करावं लागणार आहे. यापूर्वी 2019 मध्ये बेईमानी झाली पण जुन्या गोष्टींचा उल्लेख करणार नाही. त्यावेळी सगळे आमदार संघर्ष करत होते. मात्र एकही आमदार आपल्याला सोडून गेला नाही. महाराष्ट्रात एक अभूतपूर्व इतिहास रचल्याचे फडणवीस यांनी सांगितले. ऐतिहासिक जनादेश मोदीजी सलग तीन वेळा पंतप्रधान झाले आहेत आणि आता मी वॉर्ड स्तरावरचा कार्यकर्ता मुख्यमंत्री झालो आहे. पंतप्रधान मोदी आणि अमित शहा या दोघांनीही महाराष्ट्र भाजपला निवडणुकीत मोठा पाठिंबा दिला आहे. या निवडणुकीत प्रचंड बहुमत मिळाले. हा अभूतपूर्व असा जनादेश आम्हाला देण्यात आला. त्यामुळे आमची जबाबदारी आता अधिक वाढली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!