बॉलीवूड सेलिब्रेटींकडून विकी-कतरिनाला आहेरात मिळाले गिफ्ट,किंमत वाचून व्हाल थक्क!

मुंबई:- बॉलीवूडमध्ये सध्या लग्न सराईच्या चर्चांनी जोर धरलाय. अशातच नुकताच विकी कौशल आणि कतरिना कैफ यांचा शाही विवाह सोहळा मोठया थाटामाटात पार पडलाय. या सोहळ्याला विकी कौशल आणि कतरिना कैफ यांना आहेरात आपल्या बॉलीवूड मधील मित्र-मैत्रिणींनी भारी किंमतीच्या भेटवस्तू देऊ केलेत.
या भेटवस्तूंची किंमती जवळपास लाखांपासून कोटींपर्यंत आहे.शाहरूख खान,सलमान खान,हृतिक रोशन,रणबीर कपूर यांच्यासह अन्य दिग्गज बॉलीवूड स्टार्संनी कतरिनाला भेटवस्तू देऊ केलेत.पाहुयात कोणी-कोणी कतरिना-कैफला काय-काय भेटवस्तू दिलेत.
अभिनेता हृतिक रोशननं विकी-कौशल या जोडप्याला BMW बाईक भेट दिली आहे.या बाईकची किंमत जवळपास ३ लाख रुपयांएवढी आहे.तर अभिनेता शाहरुख खाननं सोने आणि हिऱ्याने जडवलेलं पेंडेंट भेट दिलंय.हे पेंडेंट खास विदेश बनावटीचं असल्याचे बोलले जात आहे.
याचसोबत अभिनेत्री तापसी पन्नूनं प्लॅटिनम ब्रेसलेट कतरिनाला भेट म्हणून दिलं आहे.तर भाईजान सलमान खाननं तब्बल ३ कोटी रुपयांची रेंज रोव्हर कार कतरिनाला भेट म्हणून दिली आहे.याचसोबत रणबीर कपूरनी या जोडप्याला महागडे डायमंडस भेट म्हणून दिले आहे.