महाराष्ट्र
गृहरक्षक दलातील माजी जवानाचा प्रामाणिकपणा, दहा तोळे सोन्याची बॅग विवाहितेकडे सुपूर्द.

चिपळूण: परशुराम ते तालुक्यातील कांदोशीदरम्यान रिक्षाने प्रवास करणाऱ्या एका विवाहितेची १० तोळे सोन्याची हरवलेली बॅग परत करत प्रामाणिकपणाचे दर्शन घडवणाऱ्या कुळवंडी येथील गृहरक्षक दलातील माजी जवान संतोष यशवंत नरळकर यांचे सर्वच स्तरांतून कौतुक होत आहे. शांताराम टेरवकर (रा. परशुराम-चिपळूण) हे कन्येसह रिक्षातून प्रवास करत होते. कुळवंडीनजीक रिक्षातून बॅग रस्त्यावर पडली होती.