मुंबई

“धर्मवीर २” बघा अवघ्या ९९ रुपयात

मुंबई – नवरात्रीचे खास औचित्य साधुन “धर्मवीर २” हा चित्रपट रसिक प्रेक्षकांसाठी आज अवघ्या ९९ रुपयांमध्ये थिएटरला पाहण्याची अनोखी संधी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. शिवसेनेचे दिवंगत नेते, ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित ‘धर्मवीर – मुक्काम पोस्ट ठाणे’ चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर आता या चित्रपटाचा पुढील भाग ‘धर्मवीर २ – साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट’ नावाने प्रेक्षकांच्या भेटीला २७ सप्टेंबरला जगभरात प्रदर्शित करण्यात आला. रसिक प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद या चित्रपटाला सर्वत्र मिळत असून आजपर्यंत चित्रपटाने तब्बल १२.२८ कोटींचा गल्ला कमावला आहे. १५०० पेक्षा ही अधिक शोजने या चित्रपटाची सुरुवात करण्यात आली. ‘नाथा घरच्या आनंदाची गोष्ट’, ‘व्हू इज एकनाथ शिंदे सांगणारी दिघेंच्या हिंदुत्वाची गोष्ट’ , चरित्रपटातून प्रखर हिंदूत्वाचा जागर…. अशा शब्दांत समीक्षकांनीही चित्रपटाला गौरवले आहे.

धर्मवीर चित्रपटानंतर “धर्मवीर २” चित्रपटात नक्की काय दाखवले जाणार याची उत्सुकता प्रेक्षकांना होती. त्याचेच प्रतिबिंब आपल्याला बॉक्स ऑफिसवर प्रेक्षक प्रतिसादातून दिसून येत आहे. प्रेक्षकांना पडलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरं या चित्रपटानं दिली असून, ज्यांनी हा चित्रपट पाहिला त्यांना ती योग्य प्रकारे मिळाली आहेत महिला वर्गाचा चित्रपटाला मिळत असलेला प्रतिसाद लक्षणीय असून चित्रपट पाहण्यासाठी संपूर्ण कुटुंबच चित्रपटगृहात जात असल्याचे चित्र दिसते आहे. केवळ मुंबई, ठाणे,पालघर नाही तर पुणे,कोल्हापुर, इचलकरंजी, नाशिक, छ.संभाजीनगर, मराठवाडा अशा संपूर्ण महाराष्ट्रात चित्रपटला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. येत्या काही दिवसांमध्ये कलेक्शनमध्ये आणखी वाढ होईल यात शंका नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!