ब्रेकिंग
कोकणात तुफान अवकाळी पावसाची शक्यता; तर उर्वरित महाराष्ट्राला उष्णतेचा चटका

मुंबई :- कोकणात २ दिवस विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या अवकाळी पावसामुळे कोकणातील आंबा, काजू, केळी बागायतदार शेतकरी चिंतेत आहे. ऐन मोसमात अवकाळी पावसामुळे आंबा,काजू धोक्यात आला आहे.
उर्वरित राज्यात पुढील ४ दिवस उन्हाचा चटका कायम राहणार आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक शहरांमधील कमाल तापमानाचा पारा ४१ अंश सेल्सिअसच्या पुढे गेला आहे. हा पारा असाच राहणार असून, ४ दिवस उन्हाचे चटके सोसावे लागणार आहेत.