ब्रेकिंग

फास्टॅग बंद होणार? आता ‘अशी’ होणार टोलवसुली..

आता 'फास्टॅग' ऐवजी 'जीपीएस'(GPS) प्रणाली तंत्राचा वापर करण्याचा केंद्र सरकारचा विचार

मुंबई:- टोल नाक्यावर लागणाऱ्या गाड्यांच्या लांब रांगा आणि गर्दी कमी करण्यासाठी केंद्र सरकारने ‘फास्टॅग’ प्रणाली सुरु केली होती.मात्र, आता ‘फास्टॅग’ ऐवजी ‘जीपीएस'(GPS) प्रणाली तंत्राचा वापर करण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे.

संसदीय समितीने ‘फास्टॅग’ हटवण्याची शिफारस केली आहे. परिवहन आणि पर्यटन संसदेच्या समिती अध्यक्षांनी बुधवारी संसदेमध्ये एक रिपोर्ट सादर केला. यानुसार आता ‘जीपीएस’ प्रणाली लवकरच सुरु होणार आहे.जीपीएस यंत्रणेच्या मदतीने टोलचे पैसे बँक खात्यातून वजा करणारी यंत्रणा उभी राहणार आहे.

ऑनलाईन रिचार्ज करताना काहीजणांना अडचणींचा सामना करावा लागतो. मात्र जीपीएस यंत्रणा कार्यान्वित झाल्यानंतर या समस्येतून कायमची वाहनधारकांची सुटका होण्यास मदत होणार आहे. याशिवाय टोल नाका उभा करण्याचा खर्चही कमी होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!