खोदकाम करताना मजुरांना सापडली सव्वाशे वर्षे जुनी पेटी, उघडताच सर्वच झाले आश्चर्यचकित !

व्हर्जिनिया – आजवर संशोधन आणि उत्खननाच्या माध्यमातून अनेक ऐतिहासिक कोडी सुटत आहेत. अशाच प्रकारे अमेरिकेत खोदकामादरम्यान तांब्याची एक पेटी सापडली आहे. ही पेटी तब्बल सव्वाशेहून अधिक वर्षे जुने आहे. ही पेटी उघडल्यानंतर लोक आश्चर्यचकित झाले आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार काही मजूर अमेरिकेच्या व्हर्जिनिया राज्यात २० व्या शतकातील लष्कर अधिकारी जनरल रॉबर्ट यांच्या प्रतिमेखाली खोदकाम करत होते.
या खोदकामादरम्यान खोदकामाचे काम करणाऱ्या मजुरांना एक तांब्याची पेटी आढळली. ही पेटी पाहून सर्व मजूर आणि उपस्थित अधिकारी आश्चर्य चकित झाले. ही पेटी तब्बल १३० वर्षापूर्वी इथे पुरण्यात आल्याची माहिती त्यावर नोंद केली होती. व्हर्जिनियाचे गव्हर्नर राल्फ नॉर्थम यांनी याचे फोटो ट्विटरवर शेअर केले आहेत. ही तांब्याची पेटी म्हणजे एक ‘टाईम कॅप्सुल’ असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
या टाईम कॅप्सुलचाच अनेक दिवस आपण शोध घेत असल्याचे आधिकाऱ्यांनी सांगितले. या टाईम कॅप्सुलमध्ये जेव्हा अमेरिकेत गृहयुद्ध झाले होते, त्याबद्दल दस्तावेज आहेत. तसेच अमेरिकेचे १६ वे राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांचे जुने फोटो, जुनी नाणी, बटन, बंदुकीच्या गोळ्या आणि जुन्या काळातील नकाशे आढळले आहेत.
जनरल रॉबर्ट ई ली हे विसाव्या शतकातील मोठे लष्कर अधिकारी होते. १८७० सलई त्यांचे निधन झाले. त्यांच्या आठवणीत १८९० साली हा पुतळा बसवण्यात आला होता. जनरल रॉबर्ट यांचा पुतळा म्हणजे वंशभेदाच्या अन्यायाचे प्रतीक म्हणून पाहिले जाते. त्यांच्या पुतळ्याखाली आढळलेल्या या पेटीचा तपास सुरू आहे.