आरे डेअरी नजीक बिबट्याने महिलेवर केला हल्ला: पहा थरारक व्हिडियो
नशीब बलवत्तर म्हणून बचावली महिला..

मुंबई:गेल्या काही दिवसांपासून आरे कॉलनी परिसरात बिबट्यांचे मानवी वस्तीवर सतत हल्ले करण्याचे प्रमाण वाढले असून काल बुधवारी सायंकाळी पावणे आठ च्या दरम्यान आरे मध्यवर्ती दुग्धशाळे जवळ बिबट्याने एका वृद्ध महिलेवर प्राणघातक हल्ला केला.
आरे डेयरी येथे असलेल्या ‘विसावा’ या कर्मचारी विश्रामगृह परिसरात वस्तीत बिबट्या दबा धरून बसला होता. या घरातील महिला सायंकाळी पावणे आठ च्या दरम्यान हातात काठी घेऊन घराच्या ओसरी वर बसताच सदर बिबट्याने पाठीमागून दबकत येत या महिलेच्या मानेला पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र शेवटच्या क्षणी महिलेला बिबट्याची चाहूल लागताच तिने हातातल्या काठीने त्याच्यावर प्रहार केला. या गडबडीत महिला तोल जाऊन जवळपास आडवी पडली. त्यासरशी बिबट्याने तिच्यावर उडी घेण्याचाही प्रयत्न केला मात्र जिवाच्या एकांताने ओरडत या महिलेने हातातल्या काठीचे बिबट्यावर प्रहार करणे सुरूच ठेवले, महिलेचा ओरडण्याचा आवाज ऐकून आजूबाजूचे लोक येताच बिबट्याने धूम ठोकली.
या घटने अगोदर २ दिवस अगोदर म्हणजे सोमवारीच आरे कॉलनीतील युनिट क्रमांक २२ जवळ बिबट्याने चार वर्षाच्या मुलावर हल्ला करून त्याला तोंडात धातून जबळजवळ ३० फूट खेचत नेले होते मात्र मुलाच्या काकाने बिबट्याचा पाठलाग करून आपल्या पुतण्याचा जीव वाचवला होता. दरम्यान आरे कॉलनीत बिबट्यांचा माणसांवर हल्ले करण्याच्या प्रकारात वाढ झाली असून देखील वनखाते पिंजरे लावण्याबाबत उदासीन दिसत आहेत. या विभागाचे आमदार रवींद्र वायकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते उपलब्ध झाले नाहीत.
पहा व्हिड़ियो: